ब्रिटन संसदेने ‘ब्रेक्झिट’ फेटाळला; पंतप्रधान थेरेसा मे यांना धक्का

लंडन : पुढारी ऑनलाईन

ब्रिटनच्या संसदेतील खासदारांनी पंतप्रधान थेरेसा मे यांचा युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा (ब्रेक्झिट) करार बहुमताने फेटाळून लावला आहे. संसदेच्या कनिष्ठ सभागृहात (हाउस ऑफ कॉमन्स) ब्रेक्झिट कराराच्या बाजूने केवळ २०२ मते तर विरोधात ४३२ मते पडली. हा निकाल पंतप्रधान थेरेसा मे धक्का देणारा असून त्यांना  राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता आहे. 

ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या ब्रेक्झिट कराराला गेल्या युरोपीय महासंघाच्या सदस्य देशांच्या नेत्यांनी मान्यता दिली होती. ब्रिटन सोडून उर्वरित २७ देशांच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला. मात्र, यबाबतचा करार ब्रिटन संसदेतील खासदारांनी फेटाळून लावला आहे.

ब्रेक्झिटमधून बाहेर पडण्यासाठी २९ मार्च ही तारीख निश्चित केली आहे. यासाठी केवळ दोन महिने वेळ उरला आहे. संसदेत या कराराला मान्यता न मिळाल्याने ब्रिटनसाठी युरोपीप महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय अडचणीचा ठरला आहे. यामुळे ब्रेक्झिटसाठी आता अतिरिक्त वेळ मागितला जाण्याची शक्यता आहे.

तब्बल १८ महिने चाललेल्या प्रक्रियेनंतर गेल्या नोव्हेंबरमध्ये युरोपीय महासंघाबरोबरच्या ब्रेक्झिट कराराबाबत सहमती झाली होती. डिसेंबरमध्ये कराराबाबत कनिष्ठ सभागृह (हाउस ऑफ कॉमन्स) मतदान होणार होते. मात्र, पराभवाच्या भीतीने मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती. अखेर यासाठी मतदान झाले. यात थेरेसा मे यांच्या सरकारला जोरदार धक्का बसला आहे.

तर विरोधी पक्षाचे नेते जेरीमी कोर्बिन यांनी म्हटले होते की, पंतप्रधान थेरेसा मे संसदेतील सदस्यांची चिंता दूर करण्यास अपयशी ठरल्या आहेत. त्यांचा मतदानानंतर पराभव झाला तर त्यांना निवडणुकीला सामोरे जावे लागेल.

वाचा : 'ब्रेक्झिट'नंतर बदलणार इंग्लंडच्या पासपोर्टचा रंग

ब्रेक्झिट करारावर मंगळवारी सायंकाळी ७ वाजता मतदान सुरू झाले आणि उशिरा रात्री निकाल जाहीर करण्यात आला. ब्रिटीश संसदेत ब्रेक्झिट कराराला मान्यता मिळणे हे एक आव्हान आहे. कारण अनेक सदस्याचा त्याला जोरदार विरोध आहे. या विरोधाचा सामना पंतप्रधान मे यांना करावा लागला. ब्रिटनने युरोपीय महासंघात राहावे की त्यातून बाहेर पडावे, यासाठी ब्रिटनमध्ये २४ जून २०१६ रोजी सार्वमताचा कौल घेतला. हा कौल युरोपीय महासंघातून बाहेर पडावे, या बाजूने लागला होता. 

 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news