Bristol Museum Heist | ‘ईस्ट इंडिया कंपनी’शी संबधित वस्तूंसह 600 मौल्यवान वस्तूंची ब्रिटनमधील संग्रहालयातून चोरी!

ब्रिस्टल शहरातील एका वस्तूसंग्रहालयाच्य स्टोरेज रुममधील घडली सप्टेंबरमध्ये घटना, पोलिसांनी आता केली माहिती उघड
Bristol Museum Heist
Bristol Museum Heist
Published on
Updated on

United Kingdom युनायटेड किंगडममधील ब्रिस्टल येथील एक घटना समोर आली आहे. याची कलाजगतात चर्चा सुरु झाली आहे. ही घटना चोरीची असून यामध्ये तब्बल 600 वस्तू चोरट्यांनी गायब केल्या आहेत. यामध्ये दुर्मिळ बौद्ध मुर्तीं, भारतात व्यावारासाठी आलेली व राज्यकर्ते झालेली ईस्ट इंडिया कंपनीशी संबधित वस्तूंचा समावेश आहे. भारताशी संबंधित ऐतिहासिक वस्तूंचाही समावेश असल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. कॉमनवेल्थ देशामधून आलेल्याही अनेक वस्तूंचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी २५ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे १ ते २ च्या सुमारास ब्रिस्टलच्या 'कंबरलँड रोड' परिसरातील एका इमारतीत झाली. या इमारतीत ब्रिस्टल मुझियमचा 'ब्रिटीश एम्पायर अँड कॉमनवेल्थ' संग्रह ठेवण्यात आला होता. याची माहिती पोलिसांनी आता प्रसारमाध्यमांना दिली आहे.

या मौल्यवान वस्तू गेल्या चोरीला

'ईस्ट इंडिया कंपनी'च्या एका अधिकाऱ्याचा कंबरपट्टा (Waist Belt Buckle), हस्तिदंती बुद्ध मूर्ती आणि हस्तिदंती हत्तीची कलाकृती. लष्करी पदके (Medals), बॅजेस, सोन्या-चांदीचे दागिने, कांस्य मूर्ती, ऐतिहासिक जहाजांचे कंदील आदी वस्तूंचा समावेश आहे.

या घटनेचा तपास एव्हॉन आणि समरसेट पोलिसांनी सुरू केला आहे. सुमारे दोन महिन्यांनंतर पोलिसांनी या घटनेतील चार संशयित आरोपींचे सीसीटीव्ही फोटो जारी केले आहेत. हे चारही पुरुष असून त्यांनी तोंडाला मास्क लावले होते आणि त्यांच्या हातात मोठ्या बॅगा दिसत आहेत. अशी माहीती पोलिसांनी दिली आहे.

या संग्रहालयात हजारो वस्तू आहेत. त्यामुळे नक्की कोणत्या आणि किती वस्तू चोरीला गेल्या आहेत, याची मोजणी करण्यासाठी तज्ज्ञांना बराच वेळ लागला. त्‍यामुळे याचा तपास करण्यासाठी वेळ लागत आहे. या वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी किंमत असून, त्या ऑनलाइन विकल्या जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news