पुढारी ऑनलाईन डेस्क : कॅनडातील एका हिंदू मंदिरात रविवार, ३ नोव्हंबर रोजी खलिस्तानवाद्यांनी भाविकांना मारहाण केली होती. या संतापजनक घटनेनंतर प्रक्षोभक विधान करुन दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी मंदिरचे पुजारी रजिंदर प्रसा यांना हटविण्यात आले असल्याचे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ब्रॅम्प्टनचे महापौर पॅट्रिक ब्राउन यांनी पुजाऱ्याविरुद्ध मंदिर मंडळाच्या कारवाईचे वृत्त सोशल मीडियवर शेअर केले आहे.
ब्रॅम्प्टनमधील हिंदू सभा मंदिर संकुलात खलिस्तानी अतिरेक्यांनी हिंदू-कॅनेडियन भाविकांवर हल्ला केला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये हल्लेखोर खलिस्तान समर्थनाच्या घोषणा देत हिंदू भाविकांवर हल्ला करताना दिसले. यानंतर मंदिराचे पुजार्यांनी प्रक्षोमक विधान सोशल मीडियावर केले. याची गंभीर दखल हिंदू सभा मंदिराचे अध्यक्ष मधुसूदन लामा यांनी घेतली. हिंसाचाराला खतपाणी घालणारे विधान करणार्या पुजार्याला हटविण्यात आल्याचे त्याांनी सांगितले.