

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानातील खैबर पख्तून प्रातांतील एका मदरशामध्ये झालेल्या शक्तीशाली स्फोटात ५ जण ठार झाले आहेत. एपी वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. सुरक्षा दलांनी घटनास्थळावरुन ११२२ जणांना सुखरुप बाहेर काढले आहे. यामध्ये २० नागरिक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दारुल उलूम याठिकाणी शुक्रवारच्या नमाजावेळी हा स्फोट झाला. मदरशामधील मुख्य हॉलमध्ये हा स्फोट झाला असल्याचे सुत्रांनी सांगितले. या घटनेमुळे या प्रांतात कर्फ्यू लावण्यात आला आहे.पोलिसप्रमुख अब्दूल रशिद यांनी याला दुजोरा दिला आहे.
खैबूर पख्तूना प्रांताचे इन्पेक्टर जनरल झुल्पिकार हमीद यांनी सांगितले की या मानवीबॉम्ब चे टार्गेट या मदरशाचे प्रमुख मौलाना हमिदूल हक हक्कानी होते. जामिया दारुल उलुम हक्कानी आणि जमाते उलेमा ऐ इस्लाम या संस्थाचे प्रमूख म्हणून मौलाना हक्कानी काम पाहतात.वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी या संस्थांची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच त्यांचे राजकीय वलयही आहे. ते २००२ ते २००७ दरम्यान नॅशनल ॲसेम्ब्लीमध्ये कार्यरत होते.