Bill Gates superyacht | बिल गेट्स विकणार अलिशान यॉट? किंमत 5400 कोटी रुपये; लिक्विड हायड्रोजनवर चालते ही नौका

Bill Gates superyacht | 7 डेक, बास्केटबॉल कोर्ट, थिएटर, हॉस्पिटल, ग्रंथालय सुविधाही यॉटवर; गेट्स यांनी या यॉटवर एकदाही पाऊल ठेवलेलं नाही!
bill gates secret supreyacht breakthrough
bill gates secret supreyacht breakthroughPudhari
Published on
Updated on

Bill Gates superyacht

पुढारी ऑनलाईन डेस्क ः मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि अब्जाधीश बिल गेट्स यांची कथित मालकीची असलेली अत्याधुनिक लक्झरी यॉट ‘Breakthrough’ विक्रीसाठी सज्ज झाली असून, तिची किंमत तब्बल $645 दशलक्ष (सुमारे 5400 कोटी रुपये) इतकी ठेवण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, ही भव्य नौका पूर्णतः लिक्विड हायड्रोजनवर चालते आणि अजूनपर्यंत बिल गेट्स यांनी तिच्यावर एकदाही पाऊल ठेवलं नाही.

ब्रेकथ्रु - फ्युचरिस्टीक यॉट

पूर्वी Project 821 या नावाने ओळखली जाणारी ही यॉट नेदरलँड्समधील Feadship कंपनीने पाच वर्षांच्या मेहनतीनंतर तयार केली आहे. RWD डिझाईन स्टुडिओने याचे डिझाईन केले असून, ही यॉट जगातील पहिली "नेट-झीरो" सुपरयॉट आहे, जी हायड्रोजन इंधनाच्या साहाय्याने पूर्णपणे स्वच्छ ऊर्जा निर्माण करते.

यात वापरलेले फ्युएल-सेल तंत्रज्ञान स्वच्छ वीज निर्माण करते आणि उष्णतेचा अतिरेक टॉवेल वॉर्मर्स, स्टीम रूम, स्विमिंग पूल आणि बाथरूमच्या फ्लोअरिंगमध्ये पुनर्वापर केला जातो. हायड्रोजन उपलब्ध नसल्यास, बायोफ्युएल बॅकअप वापरले जाते, ज्यामुळे कार्बन उत्सर्जनात 90 टक्केपर्यंत घट होते.

bill gates secret supreyacht breakthrough
Singapore sinkhole rescue | सिंगापुरचे राष्ट्रपती करणार 7 भारतीयांचा गौरव; सिंकहोलमध्ये कारसह बुडणाऱ्या महिलेचा वाचवला होता जीव

यॉटवर बास्केटबॉल कोर्ट, थिएटर, हॉस्पिटल, ग्रंथालय

या 390-फुट लांबीच्या यॉटमध्ये सात डेक्स, फुल-साईज बास्केटबॉल कोर्ट, सिनेमा थिएटर, हॉट टब्स, खाजगी हॉस्पिटल, तसेच चार मजली टाउनहाऊससारखी अंतर्गत रचना आहे. यामध्ये कार्यालये, ग्रंथालये, फायरप्लेस, आणि समुद्राकडे विस्तृत दृश्यमानता देणाऱ्या टेरेसेस आहेत.

15 गेस्ट कॅबिन्समधून 30 पाहुण्यांची राहण्याची सोय आणि 43 क्रू मेंबर्ससाठी खास जागा आहे. यॉटमध्ये लेदर, मार्बल, ओक, आणि रॅटन अशा उच्च दर्जाच्या साहित्यांचा वापर करण्यात आला आहे.

मालकत्वावर गूढतेचं सावट

या यॉटवर बिल गेट्स यांनी स्वतः कधीही पाऊल ठेवलं नसल्याचं समोर आलं आहे. त्यांनी यॉटचं मालकत्व जाहीरपणे मान्य केलं नाही, परंतु अनेक सूत्रांनी ही यॉट त्यांच्या निर्देशानुसार तयार करण्यात आली असल्याचा दावा केला आहे.

bill gates secret supreyacht breakthrough
US Pakistan Oil Deal | धक्कादायक! अमेरिकेचा पाकिस्तानसोबत तेल करार; ट्रम्प म्हणाले- एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल...

कॅनडाचे अब्जाधीश यॉट खरेदीसाठी उत्सुक

ही यॉट येत्या 24 ते 27 सप्टेंबर 2025 दरम्यान मोनॅको यॉट शोमध्ये सर्वांच्या समोर सादर केली जाणार आहे. Boat International ने दिलेल्या माहितीनुसार ही यॉट या वर्षीच्या शोमधील सर्वात मोठी नौका असणार आहे.

याचदरम्यान, Green For Life Environmental चे सीईओ, कॅनेडियन अब्जाधीश पॅट्रिक डोविगी हे यॉट विकत घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

ही यॉट Edmiston ब्रोकरेज कंपनीमार्फत विक्रीसाठी उपलब्ध असून, कंपनीचे सीईओ जेमी एडमिस्टन म्हणाले, "ही यॉट उद्योगात सर्व काही बदलून टाकणार आहे. ही यॉट "सगळ्यात पर्यावरणस्नेही, अत्याधुनिक आणि भविष्याचा आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news