बिल गेट्स आपल्‍या मुलांना किती संपत्ती देणार? म्‍हणाले,"१ टक्‍क्‍यापेक्षा कमी..."

Bill Gates : मुलांनी स्‍वबळावर संपत्तीची निर्मिती करावी
Bill Gates
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि जगातील दानशूर उद्‍योजक अशी बिल गेट्स आपल्‍या मुलांसमवेत.Pudhari
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि जगातील दानशूर उद्योजक अशी बिल गेट्स (Bill Gates) यांची ओळख आहे. त्‍यांच्‍या अब्‍जावधी रुपयांच्‍या संपत्तीची नेहमीच चर्चा होत असते.आता या संपत्तीमधील आपल्‍या मुलांना किती वाटा देणार? या प्रश्‍नाचे उत्तर त्‍यांनी एका पॉडकास्‍टमध्‍ये बोलताना दिले.

संपत्ती वारशाने मिळण्‍याऐवजी...

नुकतेच 'फिगरिंग आउट विथ राज शमानी' पॉडकास्टमध्ये बोलताना बिल गेट्‍स म्‍हणाले की, "मी माझ्‍या मुलांना माझ्‍या संपत्तीमधील १ टक्‍क्‍यापेक्षा कमी हिस्‍सा देण्‍याच्‍या विचारात आहे. संपत्ती ही वारसा हक्‍काने मिळवण्‍याऐवजी मुलांनी स्‍वबळावर संपत्तीची निर्मिती करावी. श्रीमंत कुटुंबांनी त्यांच्या वारशाबद्दल घेतलेले निर्णय बहुतेक त्यांच्या स्वतःच्या मूल्यांवर अवलंबून असतात."

माझी मुले राजघराण्‍यातील नाहीत...

शेवट आपल्‍या संपत्तीचे काय करायचे, हा निर्णय प्रत्‍येकाने घ्‍यायचा आहे. मुलांनी वडिलांच्‍या अविश्‍वसनीय नशीबाने झाकोळून जावे, असे मला वाटत नाही. माझ्‍या मुलांना "उत्तम संगोपन आणि शिक्षण मिळाले आहे; परंतु आता माझ्‍या एकूण संपत्तीच्या १% पेक्षा कमी संपत्ती मिळेल. मुलांना तुमच्या पाठिंबा आण प्रेमाने गोंधळून जावे" असे मला वाटत नाही. कारण माझी मुले काही राजघराण्‍यातील नाहीत. मी त्यांना मायक्रोसॉफ्ट चालवण्यास सांगत नाही. त्यांना स्वतःची कमाई आणि यश मिळवण्याची संधी देऊ इच्छितो. "

बिल गेट्स यांची संपत्ती किती?

'ब्लूमबर्ग'ने नुकतीच प्रकाशित केलेल्‍या अब्जाधीश निर्देशांकानुसार, बिल गेट्स यांची मालमत्तेची किंमत $१५५ अब्ज आहे. आता यातील १ टक्‍का म्‍हणजे $१.५५ अब्ज डॉलर होतात. गेट्सच्या तिन्ही मुलांकडे त्यांच्या वडिलांइतकी संपत्ती नसली तरी त्यांच्या मालमत्तेमुळे ते कदाचित जगातील लोकसंख्येच्या सर्वात श्रीमंत एक टक्का लोकांमध्ये सामील होतील. दरम्‍यान, गेट्स हे एकमेव अब्जाधीश नाहीत ज्‍यांनी त्यांचे प्रचंड संपत्तीमधील फक्त काही रककम त्यांच्या मुलांसाठी न ठेवण्याची योजना आखत आहेत. ॲपलचे दिवंगत स्टीव्ह जॉब्स आणि ॲमेझॉनचे जेफ बेझोस यांसारख्या अनेक प्रमुख तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांनी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संपत्ती हस्तांतरित करण्यापेक्षा परोपकाराला प्राधान्य दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news