Bill Gates : बिल गेटस यांच्या २३ वर्षीय मुलीने तिन दिवसातच संपवले ३ कोटी रुपये, पॉकेटमनीतून असा खर्च पाहून गेटस् हैराण!

आठवड्याला देतात साडेतीन लाख डॉलर्स पॉकेटमनी, फोबी गेट्स आहे बील गेटस् यांचे तिसरी मुलगी
Bill Gates, Phoebe Gates
Bill Gates, Phoebe Gates
Published on: 
Updated on: 

Bill Gates Daughter Phoebe Gates मॉयक्रोसॉफ्टचे संस्थापक अब्जाधिश बिल गेटस त्‍यांच्या विधानाने चर्चेत आले आहेत. त्‍यांची २३ वर्षीय मुलगी फोबी हिला ते आठवड्याला साडेतिन लाख रुपये इतका पॉकेट मनी देतात भारतीय रुपायाते ते साधारण ३ कोटी रुपये होतात. पण हेच पैसे फोबीने तीन दिवसातच संपवल्याने गेटस यांना धक्का बसला. तिच्या या अशा खर्च करण्याच्या सवयीमुळे मी हैराण झालो व तिला सक्त सूचना केल्या असल्याचे बिल गेटस यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटले आहे.

आठवड्याला साडेतिन लाख डॉलर पॉकेटमनी

बिल गेट्स यांनी सांगितले की, ते दर आठवड्याला त्यांच्या मुलीला 3,50,000 डॉलर (जवळपास 3 कोटी रुपये) देतात. मात्र धक्कादायक बाब म्हणजे एवढी मोठी रक्कम मिळाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच ती पुन्हा तितक्याच रकमेची मागणी करत पुढे आली. सततच्या बेहिशेबी खर्चामुळे गेट्स हैराण झाले होते. जेव्हा त्याने फोबीकडे हिशेब मागितला तेव्हा त्याला कळले की इतके पैसे कुठे आणि कशासाठी खर्च केले जातात हे तिने सत्य देखील सांगितले नाही. बिल गेट्स म्हणाले, "मी फोबीला दर आठवड्याला $350,000 देतो, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, फक्त तीन दिवसांनी ती $350,000 मागत परत आली. जेव्हा मी तिच्या खर्चाबद्दल प्रश्न विचारण्यास सुरुवात केली, तेव्हा मला समजले की ती नेहमीच पैसे कुठे खर्च केले जात आहे याबद्दल सत्य सांगत नाही."

तर मी अब्जाधिश बनलोच नसतो

बील गेटस हे जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक, त्यांच्या साधेपणासाठी आणि हुशारीने खर्च करण्याच्या सवयीसाठी त्‍यांना ओळखले . पण, तोंडात चांदीची चमक घेऊन जन्मलेली त्यांची धाकटी मुलगी फोबी हिच्या पैसे खर्च करण्याच्या सवयीमुळे ते त्रासले आहेत. आपल्या मुलीची ही बेजबाबदार सवय पाहून बिल गेट्स संतापले. त्यांनी तिला बजावले की जर तिने असेच पैसे वाया घालवले तर ते तिला पैसे खर्च करण्यापासून रोखतील. गेट्स आपल्या मुलीला म्हणाले, 'फोबी, जर मी तुझ्यासारखा विचार न करता पैसे खर्च केले असते तर मी कधीही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनू शकलो नसतो..''

बिल गेट्स यांनी 1994 मध्ये मेलिंडा गेट्सशी लग्न केले आणि 2021 मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला. गेट्स दाम्पत्याला तीन मुले आहेत. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. जेनिफर गेट्स असे मोठ्या मुलीचे नाव असून तिचे लग्न नासिर नय्यर यांच्याशी झाले आहे. रॉरी गेट्स हा बिल गेट्स यांचा एकुलता एक मुलगा. तर फोबी गेट्स ही बील व मेलिंड यांची सर्वात लहान मूलगी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.