
16 billion password leak massive data breach 2025 cyber security threat stolen passwords dark web Google FBI warning
नवी दिल्ली : सायबर सुरक्षेच्या जगतात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. तब्बल 16 अब्ज पेक्षा अधिक पासवर्ड्स ऑनलाईन लीक झाले असून, ही इंटरनेट इतिहासातील सर्वात मोठ्या डेटा लीकपैकी एक मानली जात आहे.
Cybernews आणि Forbes च्या अहवालानुसार, या लीकमुळे जगभरातील कोट्यवधी वापरकर्त्यांचे वैयक्तिक डेटा धोक्यात आला आहे. यामुळे फिशिंग स्कॅम्स, ओळख चोरी (Identity Theft) आणि खाती हॅक होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
या लीकमध्ये ई-मेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स (Google, Facebook, Telegram), डेव्हलपर अकाउंट्स (GitHub) आणि काही शासकीय पोर्टल्स यांसारख्या अनेक सेवा व संकेतस्थळांची लॉगिन माहिती समाविष्ट आहे.
लीक करण्यात आलेली माहिती साइटचा दुवा, युजरनेम व पासवर्ड या स्वरूपात व्यवस्थितपणे मांडलेली आहे, ज्यामुळे हॅकर्ससाठी ही माहिती वापरणं अधिक सोपं होतं.
सायबर तज्ज्ञांच्या मते, ही जुनी माहिती नाही. ती इन्फोस्टीलर्स (Infostealers) नावाच्या मालवेअरद्वारे गोळा करण्यात आली आहे. हे मालवेअर गुपचूपपणे वापरकर्त्यांच्या डिव्हाइसेसवरून युजरनेम व पासवर्ड्स चोरण्याचं काम करतं आणि ही माहिती हॅकर्सपर्यंत पोहचवते. त्यानंतर ही माहिती डार्क वेबवर विक्रीसाठी टाकली जाते.
डेटा व्यवस्थित आणि वापरण्यास सोपा आहे.
16 अब्जाहून अधिक अकाउंटची माहिती एकत्र आलेली आहे.
अगदी थोड्याशा रकमेने व कमी तांत्रिक ज्ञान असलेल्यांनाही ही माहिती खरेदी करता येते.
त्यामुळे सामान्य वापरकर्त्यांपासून ते कंपन्या व संस्थांपर्यंत सर्वजण या धोक्याच्या विळख्यात आहेत.
Google ने पारंपरिक पासवर्डच्या ऐवजी पासकी (Passkeys) वापरण्याचा सल्ला दिला आहे. तसेच FBI ने SMS किंवा ई-मेलद्वारे आलेल्या संकेतस्थळांवरील लिंक्सवर क्लिक न करण्याचा, विशेषतः लॉगिन डिटेल्स विचारणाऱ्या लिंकपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
तुमचे सर्व महत्वाचे अकाउंट्सचे पासवर्ड त्वरित बदला.
प्रत्येक अकाउंटसाठी वेगळा, मजबूत पासवर्ड वापरा.
2FA (Two-Factor Authentication) सुरू करा.
पासवर्ड मॅनेजर अॅप्स वापरून पासवर्ड सुरक्षित ठेवा.
डार्क वेब मॉनिटरिंग टूल्स चा वापर करून तुमची माहिती लीक झाली आहे का हे तपासा.
ही लीक म्हणजे जगभरातील सायबर गुन्ह्यांचा नकाशा आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे इंटरनेट वापरताना अधिक दक्ष राहणं अत्यंत गरजेचं आहे.