सावधान! जागतिक मंदी येतेय...; JP Morgan सह विविध रीसर्च फर्म्सचा इशारा

Global Recession: जे. पी. मॉर्गन संस्थेच्या मते जागतिक मंदीचा 60 टक्के धोका
trump tariff Global Recession:
trump tariff Global Recession:pudhari
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर टॅरिफ लावले. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता विविध देशांकडुनही अमेरिकेच्या वस्तुंवर आयातशुल्क लावले जात आहे.

चीनने त्याची सुरवात केल्यानतंर जागतिक व्यापार युद्धाला तोंड फुटले असून याचा विनाशकारी परिणाम जागतिक वित्तीय बाजारांवर झाला आहे. यामुळे जगावर मंदिचे सावट उभे राहिले आहे, असा धोका बहुतांश जागतिक अर्थविषयक संस्थांनी व्यक्त केला आहे.

जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेने जात असून जागतिक मंदीची 60 टक्के शक्यता जागतिक गुंतवणूक संस्था JP Morgan ने व्यक्त केली आहे. पूर्वी संस्थेने ही शक्यता 40 टक्के गृहित धरली होती. पण त्यात आता संस्थेने वाढ केली आहे. (JP Morgan warns of 60% chance of global recession after Trump's tariffs)

चीनने अमेरिकेच्या सर्व वस्तुंवर अतिरिक्त 34 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर जगभरातील शेअर मार्केटमध्ये त्याचे पडसाद उमटले. JP Morgan ने स्वतःच केलेल्या भविष्यवाणीत सुधारणा केली आहे.

पूर्वी त्यांनी मंदीची शक्यता 40 टक्के वर्तवली होती. आता कंपनीने त्यात 60 टक्के अशी सुधारणा केली आहे. व्यापारविषयक धोरणांमुळे जागतिक स्तरावर व्यवसायांच्या विश्वासावरच परिणाम होईल आणि जगाची आर्थिक वाढ धीमी होईल.

वर्षाअखेरीस जागतिक अर्थव्यवस्था मंदीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता 60 टक्के आहे. अमेरिकेची विकृत व्यापारी धोरणे जागतिक स्तरावर सर्वाधिक धोकादायक आहेत, असे जे. पी. मॉर्गन संस्थेने एका निवेदनात म्हटले आहे.

जे. पी. मॉर्गनच्या निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकेचे व्यापार धोरण अपेक्षेहून कमी मैत्रीपूर्ण बनले आहे. याचा परिणाम म्हणजे अमेरिकेच्या टॅरिफला मिळत असलेले प्रत्युत्तर. टॅरिफविरोधात होत असलेली कार्यवाही. अमेरिकेच्या धोरणांमुळे पुरवठा साखळी विस्कळीत होईल.

इतर संस्थांचेही भाकीत

Barclays, BofA Global Research, Deutsche Bank, RBC Capital Markets आणि UBS Global Wealth Management अशा इतर रिसर्च फर्म्सने देखील इशारा दिला आहे की, ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ्समुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदीमध्ये जाऊ शकते.

अमेरिकेची अर्थव्यवस्था 0.1 ते 1 टक्क्यांनी वाढेल, असे अर्थतज्ज्ञांनी म्हटले आहे. अमेरिकेचे मुख्य स्टॉक मार्केट्स नोव्हेंबरमध्ये ट्रम्पच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या निवडीनंतर चांगले वाढले होते. परंतु त्यानंतर ट्रम्प टॅरिफ्सची घोषणा झाल्यामुळे वॉल स्ट्रीटवरील मुख्य निर्देशांक 8 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले आहेत.

दरम्यान, S&P Global ने त्यांच्या अमेरिकेत मंदीची शक्यता मार्चमध्ये 25 टक्के व्यक्त केली होती. ती सुरवातीला 30 टक्के ते 35 टक्क्यांदरम्यान वाढवली आहे.

गोल्डमन सॅक्सने, एप्रिल 2 च्या टॅरिफ घोषणापूर्वी अमेरिकेत मंदीची शक्यता 20 टक्क्यांवरून 35 टक्क्यांपर्यंत वाढवली. मूलभूत आर्थिक घटक पुरेसे मजबूत दिसत नाहीत, ते कमजोर आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

HSBC ने गुरुवारी म्हटले की मंदीची शक्यता अधिक आहे. स्टॉक्स या वर्षाच्या अखेरीस मंदीची 40 टक्के शक्यता दाखवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

व्याजदर कमी होण्याचीही आशा

दरम्यान, काही विश्लेषकांचे म्हणणे आहे की टॅरिफ्समुळे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हला अधिक व्याज दर कमी करण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे आर्थिक सक्रियता वाढवली जाऊ शकते.

जेपी मॉर्गनने म्हटले की, टॅरिफ्सचा परिणाम थोडा कमी होईल कारण फेडरल रिझर्व्ह व्याज दर कमी करू शकते. गोल्डमॅन, नॉमुरा आणि आरबीसी यांसारख्या ब्रोकेरेजेसनी व्याज दर कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

trump tariff Global Recession:
डोनाल्ड ट्रम्प पेंग्विनकडून टॅरिफ वसुल करणार? निर्जन बेटावर लावले 10 टक्के टॅरिफ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news