पुढारी ऑनलाईन डेस्क : बेल्जियममधील तरुणीचे अपहरण करुन पाच दिवस बलात्कार करुन हात बांधून तिला रस्त्यावर सोडल्याचा धक्कादायक प्रकार पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये उघडकीस आला आहे. प्राथमिक तपासात गुन्ह्याला पुष्टी मिळाली आहे. पोलिसांनी आरोपीला केली. पीडितेवर रुग्णालायात उपचार सुरु आहेत.
'पाकिस्तान टूडे'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की, इस्लामाबादच्या जी-6 सेक्टरमध्ये हात-पाय बांधलेल्या अवस्थेत पीडित महिलेला रस्त्यावर फेकून आरोपींनी पळ काढला होता. तिला एका स्थानिक रहिवाशाने तत्काळ आपत्कालीन सेवांशी संपर्क साधत या घटनेची माहिती दिली.पीडितेने स्वत:ची ओळख बेल्जियमची नागरिक म्हणून करून दिली. ती सुमारे सहा महिन्यांपूर्वी इस्लामाबादमध्ये आली होती. सलग पाच दिवस बलात्कार केल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. तिने केलेल्या दाव्याला प्राथमिक तपासात पुष्टी मिळाली आहे. पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली आहे.
पीडितेकड वैयक्तिक ओळख आणि प्रवासी कागदपत्रे नसल्याचा दावा पाेलिसांनी केला आहे. स्थानिक पोलिस अधिक तपासासाठी आरोपीच्या घराची झडती घेणार आहेत. ज्या रुग्णालयात पीडितेवर उपचार सुरू आहेत, त्याच रुग्णालयात आरोपी तमिजुद्दीनची वैद्यकीय तपासणी करण्याची व्यवस्थाही अधिकाऱ्यांनी केली आहे. इस्लामाबादमधील बेल्जियम दूतावास पीडित तरुणीने पाकिस्तानात प्रवास केल्याची नोंद नाही. महिलेची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे, असे वृत्त 'द डॉन'ने दिले आहे.