चीन: पुढारी ऑनलाईन
तरूणांनी वयाची विशी ओलांडली की घरी लग्नाच्या चर्चा होऊ लागतात. आपल्या मुलाला किंवा मुलीला जीवनसाथी शोधण्यासाठी घरचे बायोडाटा अनेक नातेवाईकांना देत असतात. तसेच यासोबत वेबसाईटवर माहिती देत असतात. अशा गोष्टी आपण वाचल्या, ऐकल्या, पाहिल्या असतील. मात्र जीवनसाथी शोधण्यासाठी बाजार भरतो हे कधी ऐकले आहात का? हो हे खरं आहे. चीन येथे असाही बाजार भरला जातो.
कसा भरला जातो बाजार
मॅरेज मार्केट हे शांघाय पीपल्स पार्कचे मुख्य आकर्षण आहे. येथे आपला जीवनसाथी निवडण्यासाठी पालक आणि तरूणवर्गाची गर्दी होते. आठवड्याच्या शेवटी हा बाजार भरला जातो. तेथील काही पार्कमध्ये असे बाजार भरले जातात. पार्कच्या दुतर्फा लोक आपला आपला बायेडाटा घेऊन बसतात. ए-4 साईजच्या कागादावर मॅडरिन भाषेत आपली सर्व वैयक्तिक माहिती दिले जाते. उदा. लिंग, वय, व्यवसाय, उत्पन्न, फोटो, फोन नंबर इत्यादी.
कधी पासून सुरूवात
२००५ पासून येथे असा बाजार आठवड्याच्या शेवटी भरला जात आहे. वाचल्यावर जितके हे गंमतीचे वाटत आहे तितकेच त्यामागचे कारणदेखील गंभीर आहे. २००५ पूर्वी चीन येथील काही पार्कमध्ये लोक मॉर्नीग वॉक किंवा भेटीगाठी येत असत. त्याचदरम्यान आपल्या मुलांच्या लग्नाविषयी बोलणी देखील एकमेकांसोबत होत असत. मात्र कालांतराने हा काळ बदलला. काळ बदलत गेला तसा तरूणवर्गांच्या एकमेकासंदर्भात असणाऱ्या अपेक्षा वाढत गेल्या. त्यामुळे लग्न वेळाने करणे, किंवा लग्न न करणे असे निर्णय तेथील तरूणवर्ग घेऊ लागले.
चीन येथील एका पत्रकार महिलाने दिलेल्या माहितीनुसार विकासामुळे सर्व तरूण वर्ग शांघाईसारख्या शहरामध्ये स्थलांतरीत होऊन लग्न करून आपले बस्तान इथेच बसवतात. मात्र चीनी कायद्यानुसार येथील प्रत्येक परिवारामध्ये एक मुल असल्याकारणाने बहुतांश परिवारामधील मुली या शिकलेल्या आहेत आणि त्यांच्या मागण्या, अपेक्षा पुर्ण करणारा मुलांचा वर्ग मर्यादित आहे. त्यामुळे येथील मुली लग्न न करण्याचा विचार जास्त करतात.
तर एका नागरिकाचे असे म्हणणे आहे की, लग्नासाठी पार्क हे एक चांगले व्यासपीठ आहे जिथे आपल्या आवडीनिवडीनुसार जीवनसाथी मिळू शकतो. सध्या सरकारने एक मुल धोरणावर बंदी घातली असली तरी या धोरणामुळे लग्न ही एक मोठी समस्या बनली आहे. विविध ऑनलाईन मॅरेजवेबसाईटस यांसारख्या साईट्सवरूनदेखील लग्नाचे नाते जुळणे कठीण होत आहे.