Barbie designers killed | बार्बी डॉल डिझायनर्स मारियो पगलीनो आणि जियानी ग्रोसी यांचा भीषण अपघातात मृत्यू

Barbie designers killed | इटलीत कारचा समोरासमोर धडकून दुर्दैवी अंत
Barbie designers killed
Barbie designers killedx
Published on
Updated on

Barbie designers killed

मिलान (इटली): सुप्रसिद्ध बार्बी डॉल डिझायनिंगच्या जगात मोठं योगदान देणारे आणि प्रसिद्ध डिझायनर जोडी मारियो पगलीनो आणि जियानी ग्रोसी यांचा एका भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. रविवारी इटलीतील ट्युरिन-मिलान महामार्गावर (A4) एका 82 वर्षीय वृद्ध चालकाच्या चुकीमुळे समोरासमोर झालेल्या धडकेत त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

या अपघातात त्यांच्यासोबत प्रवास करत असलेले बँक कर्मचारी अ‍ॅमोडियो व्हॅलेरिओ जिउर्नी यांचाही जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी सिल्व्हिया मोरामॅक्रो यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. वृद्ध चालक एगीडिओ सेरियानो याचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.

बार्बी ब्रँडकडून भावनिक श्रद्धांजली

'बार्बी'च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त करण्यात आले. या पोस्टमध्ये म्हटले आहे, “मारियो पगलीनो आणि जियानी ग्रोसी हे दोन अनमोल कलाकार होते, ज्यांनी बार्बीच्या जगाला कला आणि सौंदर्याने समृद्ध केले. त्यांचं योगदान अविस्मरणीय आहे.”

"Magnia2000" ही त्यांची कंपनी त्यांनी 1999 मध्ये सुरू केली होती. या कंपनीमार्फत त्यांनी सानुकूल डिझाईन केलेल्या डॉल्स जगभर प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या कलेला 2016 मध्ये बार्बीच्या प्रसिद्ध फॅशन डिझायनर कॅरोल स्पेन्सर यांनी 'Barbie Best Friend Award' देऊन गौरवले होते.

Barbie designers killed
Mira Murati Meta offer | मार्क झुकेरबर्गची तब्बल 8300 कोटी रुपयांची ऑफर चक्क नाकारली; AI जगतातील ‘क्वीन’चा ठाम निर्णय

सेलिब्रिटी डॉल्सच्या निर्मितीत विशेष ओळख

पगलीनो आणि ग्रोसी यांनी गायक सेलेब्रिटी चेर आणि लेडी गागा, तसेच अभिनेत्री सारा जेसिका पार्कर आणि सोफिया लोरेन यांच्यासारख्या जगप्रसिद्ध कलाकारांच्या प्रतिरुपातील डॉल्स तयार केल्या होत्या. ते बार्बी डॉल कलेक्टर्समध्ये खूपच लोकप्रिय होते.

प्रसिद्ध इव्हेंट आयोजक

ही जोडी इटलीमधील 'इटालियन डॉल कन्वेन्शन'चे आयोजन देखील करत होती, जिथे जगभरातील डॉलप्रेमी एकत्र येतात. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमात नेहमीच उत्साह, हास्य आणि आपुलकीचं वातावरण निर्माण होत असे.

Barbie designers killed
Tsunami hits Russia | महाभूकंपानंतर रशियाला त्सुनामीचा तडाखा; कामचत्का, कुरील बेटांवर कहर

अपघाताची भीषणता

The Independent आणि New York Post च्या अहवालानुसार, वृद्ध चालक एगीडिओ सेरियानो यांनी टोल बूथ चुकवल्यानंतर महामार्गावर चुकीच्या दिशेने जवळपास चार मैलांपर्यंत 80 मैल प्रति तास वेगाने गाडी चालवली.

एका जोडप्याने सांगितले की, “आम्ही केवळ नशिबाने वाचलो. माझ्या पतीने वेळीच गाडी वळवली, हा एक चमत्कारच होता.” पगलीनो आणि ग्रोसी यांचा मृत्यू ते एका सरोवराजवळ फिरायला जात असताना झाला, अशी माहिती समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news