पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेशमध्ये सर्वांना समान अधिकार आहेत. आम्ही सर्व एकच आहोत. आमच्यात कोणताही भेद करू नका. कृपया, आम्हाला मदत करा. संयम बाळगा आणि नंतर न्याय करा,आम्ही काय करू शकलो आणि काय नाही. आम्ही अयशस्वी झालो तर, मग आमच्यावर टीका करा,” , अशा शब्दांमध्ये बांगलादेशचे अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी देशात हिंदूंवर होणार्या अत्याचाराव भाष्य केले. त्यांनी आज (दि.१३) राजधानी ढाका येथील ढाकेश्वरी राष्ट्रीम मंदिराला भेट दिली, असे वृत्त 'डेली स्टार'ने दिले आहे. मंदिराला भेट दिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी मुहम्मद युनूस म्हणाले की, बांगलादेशमध्ये सर्व धार्मिक समुदायांसाठी हक्क समान आहेत. यामध्ये कोणताही भेदभाव नसावा. आम्ही सर्व एकच लोक आहोत ज्याचा अधिकार आहे. आमच्यात कोणताही भेद करू नका. कृपया, आम्हाला मदत करा. संयम बाळगा आणि नंतर न्याय करा आम्ही काय करू शकलो आणि काय नाही. आम्ही अयशस्वी झालो तर, मग आमच्यावर टीका करा,”
आपल्या लोकशाही आकांक्षांमध्ये नागरिकांकडे मुस्लिम, हिंदू किंवा बौद्ध म्हणून न पाहता माणूस म्हणून पाहिले पाहिजे. आपले हक्क सुनिश्चित केले पाहिजेत. सर्व समस्यांचे मूळ संस्थात्मक व्यवस्थेच्या ऱ्हासात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बांगलादेश पूजा उज्जपन परिषद आणि महानगर सर्वजनीन पूजा समितीचे नेते तसेच मंदिर व्यवस्थापन मंडळाचे अधिकारी आणि भाविक त्यांना शुभेच्छा दिल्या. कायदा सल्लागार आसिफ नजरुल आणि धार्मिक व्यवहार सल्लागार खालिद हुसेन हे होते. पूजाउत्पादन परिषदेचे अध्यक्ष बासुदेव धर यांनी युनूस यांचे पदभार स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केले.
दोन हिंदू संघटनांनी अंतरिम सरकार प्रमुख मुहम्मद युनूस यांना लिहिलेल्या पत्रात दिलेल्या माहितीनुसार, 5 ऑगस्टपासून हसीना यांनी राजीनामा देऊन देश सोडून पळून गेल्यापासून 52 जिल्ह्यांतील अल्पसंख्याक समुदायांच्या सदस्यांवर किमान 205 हल्ले झाले आहेत. बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराच्या निषेधार्थ रविवारी ह्यूस्टनमधील शुगर लँड सिटी हॉलमध्ये 300 हून अधिक भारतीय अमेरिकन आणि बांगलादेशी वंशाच्या हिंदूंनी निदर्शने केली. युनूसने यापूर्वी अल्पसंख्याक समुदायांवरील हल्ल्यांना 'घृणास्पद' म्हटले होते आणि निषेध करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध कुटुंबांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्याचे आवाहन केले होते.
बांगला देशमध्ये सलग १५ वर्ष सत्तेत असलेल्या शेख हसीना यांच्या सरकारवर मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप होता.शेख हसीना यांनी बांगलादेश पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्याचे लष्कराने जाहीर केले. यानंतर नोबेल शांतता पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांनी काळजीवाहू सरकारचे नेतृत्व करावे या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या. युनूस मागील आठवड्यात फ्रान्सहून परतले. यानंतर त्यांनी अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून शपथ घेतली आहे.