बांगला देशचा हेकेखोरपणा कायम..! चिन्मय कृष्ण दास यांचा जामीन अर्ज फेटाळला

चितगाव येथील जाहीर सभेनंतर २५ ऑक्‍टोबर रोजी झाली होती अटक
 Chinmoy Krishna Das
चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी.File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इस्कॉनचे माजी पुजारी चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांचा जामीन अर्ज बांगलादेशातील न्यायालयाने आज (दि.२) फेटाळला, असे वृत्त 'डेली स्टार'ने दिले आहे.

कोण आहेत चिन्मय कृष्ण दास?

चिन्मय कृष्ण दास हे बांगलादेशमध्‍ये बांगलादेश संमिलिता सनातनी जागरण जोते या अल्पसंख्याकांच्या हक्क आणि सुरक्षेसाठी स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या संघटनाचे प्रवक्‍ते आहेत. तसेच ते इस्कॉनचे माजी पुजारीही आहेत. त्यांनी बांगला देशमध्‍ये अल्पसंख्याक संरक्षण कायदा, अल्पसंख्याक अत्याचाराच्या खटल्यांसाठी न्यायाधीकरण आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाची स्थापना यासारख्या महत्त्वाच्या सुधारणांची मागणी केली आहे.

दास यांना का अटक करण्यात आली?

बांगलादेशमध्‍ये शेख हसीना सरकार ऑगस्‍ट महिन्‍यात सत्तेतून पायउतार झाले. २५ ऑक्टोबर २०२४ रोजी चट्टोग्राम येथे जाहीर सभेचे आयोजन करण्‍यात आले होते. लालदिघी मैदानावर सभेदरम्यान बांगलादेशच्या अधिकृत ध्वजावर भगवा ध्वज फडकावल्याचा आरोपाखाली दास यांना अटक करण्‍यात आली. 30 ऑक्टोबर रोजी चितगाव येथे चिन्मय कृष्ण दास यांच्‍यासह १८ जणांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल आला. त्‍यानंतर त्‍यांना अटक करण्यात आली. त्‍यांना चटगाव न्यायालयात हजर करण्यात आले असता त्‍यांना कोठडी सुनावण्‍यात आली.

३० मिनिटांच्‍या युक्‍तीवादानंतर जामीन अर्ज फेटाळला

आज चट्टोग्राम न्‍यायालयाचे न्‍यायाधीश मोहम्मद सैफुल इस्लाम यांच्‍यासमोर चिन्‍मय दास यांच्‍या जामीन अर्जावर सुनावणी झाली. अपूर्व कुमार भट्टाचार्जी यांनी त्‍यांच्‍या वतीने युक्‍तीवाद केला. सुमारे 30 मिनिटे दोन्ही बाजूंचा युक्तिवादानंतर चिन्मय कृष्ण दास यांचा जामीन अर्ज फेटाळला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news