Sheikh hasina resignation: बांगला देशातील २७ जिल्ह्यांमध्ये हिंदूंच्या घरांवर हल्ले, लूटमार

शेख हसीना यांच्‍या राजीनाम्‍यानंतरही हिंसाचाराचे सत्र सुरुच
Sheikh hasina resignation
बांगला देशमध्‍ये शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्‍यानंतरही हिंसाचार सुरु आहे. X (Twitter)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: बांगला देशमध्‍ये आरक्षणावरून हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी सोमवार (दि.५ ऑगस्ट) पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी देश सोडला आहे. मात्र यानंतरही बांगला देशमधील हिंसाचाराचे सत्र सुरु राहिले आहे. देशातील २७ जिल्‍ह्यांमध्‍ये वास्‍तव्‍यास असणार्‍या हिंदू बांधवांच्‍या घरांना टार्गेट केले जात आहे. तसेच लूटमारही झाल्‍याचे वृत्त बांगला देशमधील 'न्‍यू एज' आणि 'डेली स्‍टार'ने दिले आहे.

'न्यूज़ लॉन्ड्री'ने बांगला देशमधील 'न्‍यू एज' आणि 'डेली स्‍टार'चा हवाला देत दिलेल्‍या वृत्तात म्‍हटलं आहे की, बांगला देशमध्‍ये हिंदूंच्या मंदिरांवर हल्ले होत आहेत. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्‍यानंतर देशातील कट्टरतावादी जमावाने 27 जिल्ह्यांतील हिंदूंची घरे आणि व्यवसायांना मोठ्या प्रमाणात लक्ष्य केले. जमावातील लोकांनी मोठ्या प्रमाणात लुटले. ओकिया परिषदेचे मोहिंदर कुमार यांनी म्‍हटलं आहे की, बांगला देशमध्‍ये असे कोणतेही क्षेत्र किंवा जिल्हा नाही जिथे हिंदूंना मारहाण झाली नाही किंवा त्यांचे व्यवसाय लुटले गेले नाहीत.

देशातील अल्‍पसंख्‍यांक टार्गेटवर

न्‍यू एजने आपल्‍या वृत्तात म्‍हटले आहे की, “बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन युनिटी कौन्सिलने सांगितले की, सोमवारी दुपारी आणि रात्रीच्या दरम्यान 20 जिल्ह्यांमध्ये अनेक हिंदू घरे आणि व्यवसायांवर हल्ले झाले. हल्लेखोरांनी दुकाने, मंदिरे आणि घरे लुटली आणि हिंदू महिलांवर हल्ला केला तर अनेक जखमी झाले.”

सुरक्षेसाठी योग्‍य पावले उचलण्‍याची मागणी

डेली स्‍टारने आपल्‍या पहिल्‍या पानावरील वृत्तात देशातील २७ जिल्ह्यांतील हिंदूंच्या संपत्तीवर झालेल्या हल्ल्यांकडे लक्ष वेधले आहे. बांगलादेश लीगल एड अँड सर्व्हिसेस ट्रस्टने एका निवेदनात मागणी केली आहे की बांगलादेश लष्कर आणि प्रशासनाने जाळपोळ, तोडफोड आणि लूटमार करणाऱ्या गुन्हेगारांची ओळख पटवावी आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी योग्य पावले उचलावीत."

मोहम्मद युनूस कार्यवाहक पंतप्रधान होण्‍याची शक्‍यता

बांगलादेशचे नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस देशाचे अंतरिम पंतप्रधान होऊ शकतात. शेख हसीनाला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोहम्मद युनूस यांच्या नावाला पाठिंबा दिल्याचे सांगण्यात येत आहे. शेख हसीना आणि युनूस यांच्यात बराच तणाव निर्माण झाल्‍याचेही वृत्त होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news