Iran Crisis Mojtaba Khamenei: माझ्या मुलाला सुप्रीम लीडर करू नका... आयतुल्ला अली खामेनींच्या मृत्यूपत्रानं खळबळ?

Iran Crisis Mojtaba Khamenei
Iran Crisis Mojtaba Khameneipudhari
Published on
Updated on

Iran Crisis Mojtaba Khamenei: इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांना ठार केल्यानंतर इराणच्या सर्वोच्च नेतेपदी त्यांचा मुलगा मोज्ताबा खामेनी यांची निवड झाल्याचे वृत्त आहे. याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तरी तेच आता इराणचे सर्वेसर्वा असतील असे संकेत मिळाले आहेत.

इस्त्रायल - अमेरिकेने २८ फेब्रुवारी रोजी केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये आयतुल्ला अली खामेनी यांचा खात्मा झाला होता. यानंतर मोज्ताबा यांच्याकडे इराणचे सर्वोच्चे नेते म्हणून पाहिलं जात आहे. मात्र आयुतुल्ला अली खामेनी यांनी आपल्या मृत्यूपत्रात आपल्या मुलाला सर्वोच्च नेता करण्यात येऊ नये असं लिहिल्याचं समोर येत आहे.

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, 'आयतुल्ला खामेनी यांनी आपल्या मृत्यूपत्रात मोज्ताबा यांना त्यांचा उत्तराधिकारी करण्यात येऊ नये असं खासकरून सांगितलं होतं. खोसरो इसफहानी यांनी हा दावा केला असून ते नॅशनल युनियन फॉर डेमॉक्रसीचे रिसर्च डायरेक्टर आहेत. त्यांचे इराणाच्या गुप्तचर संस्थेशी देखील संबंध आहेत.

मोज्ताबा खामेनी IRGC शी संबंधित

मोज्ताबा हे ५६ वर्षाचे असून त्यांची ८ मार्च रोजी इराणचे सर्वोच्च नेता म्हणून निवड झाल्याची माहिती समोर आली होती. मोज्ताबा हे इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कोर्प्सशी अत्यंत घनिष्टरित्या संबंधित आहे. ही एक इराणची शक्तीशाली लष्करी संस्था असून IRGC ने मोज्झाबा यांना पूर्ण पाठिंबा देण्याची विनंती लोकांना केली आहे. मोज्ताबा यांनी निवड झाल्यापासून अजूनपर्यंत सार्वजनिक भाषण केलेलं नाही.

मोज्ताबांच्या निवडीला विरोध?

इराणच्या नव्या नेत्यानं कोणत्याही पदावर काम करत नाहीत किंवा त्यांच्यासाठी सार्वजनिक मतदान देखील होत नाही. मात्र ते इराणच्या सर्वोच्च नेत्यांच्या इनर सर्कलमधील एक महत्वाचे व्यक्ती असतात. मोज्ताबा हे आपल्या वडिलांपेक्षाही जास्त कट्टर असल्याचं इराणमधील सूत्रांकडून कळतंय.

मोज्ताबा यांची सर्वोच्च नेतेपदाच्या निवडीला विरोध झाल्याचं देखील कळतंय. रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार मोज्ताबा यांच्या निवडची घोषणा अनेक तास पुढे ढकलण्यात आली होती. कारण या निवडीला वरिष्ठ राजकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा विरोध होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news