Austria Cattle use Brush | ही गाय आपली पाठ ब्रशने स्वतःच खाजवते, व्हिडीओ पाहून थक्क व्हाल!

व्हिएन्ना प्राणीशास्त्र महाविद्यालयातील रिसर्च टिमने प्रकाशित केली गायीची गोष्ट, गाय प्रजातीचे प्राणी उपकरणांचा वापरही करु शकतात हे केले सिद्ध
Austria Cattle use Brush
ही गाय आपली पाठ ब्रशने स्वतःच खाजवते
Published on
Updated on

Austria Cattle use Brush ऑस्ट्रीया देशातील एक 13 वर्षांची गाय इंटरनेटवर चांगलीच व्हायरल झाली आहे. कारण ही तसेच आहे, कारण ही गाय आपली पाठ खाजवण्यासाठी बागेतील लांब दांड्याचा ब्रश वापरत असलेली दिसते. मानव अनेक गोष्टींसाठी उपकरणे वापरत असतो पण गायीनेही पाठ खाजवण्यासाठी केलेला उपकरणाचां वापर पाहून थक्क व्हायला होते.

युरोपमधील ऑस्ट्रिया देशात सध्या एक व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे. या गायीचे नाव आहे व्हेरानिका आणि ती आहे नच या गावात. या गायीची गोष्ट व्हिएन्ना प्राणीशास्त्र महाविद्यालयातील रिसर्च टिमने आपल्या ‘करंट बायोलॉजी’ या नियतकालिकात 19 जानेवारी रोजी प्रसिद्ध केली आहे.

कशी खाजवते आपली पाठ

व्हेरोनिका आपल्या तोंडांने पडलेला लाकडी दांडा असलेला ब्रश उचलते व आपले तोंड किंवा जीभ जिथे पोहचत नाही त्‍याठिकाणी या ब्रशने खाजवते, तसेच ती पाठ व पाठीमागील भाग खाजवण्यासासाठी या ब्रशचा दात असलेला भाग वापरते. तसेच मऊ भागासाठी स्तन तसेच पोटाकडील भाग खाजवण्यासाठी हँडेलचा वापर करते. त्‍यामुळे उपकरणे वापरण्यासाठी आपल्या बुद्धीचा वापर करणारी ही गाय पहिलीच ठरली आहे.

आतापर्यत अनेक वैज्ञानिकांचा अभ्यास असे सांगतो की एकाच उपकरणाचे दोन उपयोग करणे ही कला फक्त मानव व मानववंशाचा जवळचा नातेवाईक चिंपाझी यांनाच येते. पण व्हरोनिकाने एकाच ब्रशचा वेगवेळा उपयोग करुन शास्त्रज्ञांनाही थक्क केले आहे. गायीने अशा प्रकारे ब्रशचा वापर करुन हे सिद्ध केले आहे की आपल्या माहितीपेक्षा अधिक हुशार असू शकतात.

एंटोनियो आसुनो - मस्कारो या प्राणीअभ्यासक यांनी व्हेरोनिका हिचे 70 हुन अधिकवेळी परिक्षण केले. व त्‍या या निष्कर्षापर्यंत पोहचल्या की या गायीने हे अनाहूत पणे केलेली कृती नाही. तर अभ्यास सराव करुन ती ही गोष्ट साध्य करु शकली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news