तब्बल पाच हजार कि.मी. अंतरावरून डॉक्टरांनी काढला फुफ्फुसातील ट्यूमर

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने झाली शस्त्रक्रिया
AI Cancer surgery
तब्बल पाच हजार कि.मी. अंतरावरून डॉक्टरांनी काढला फुफ्फुसातील ट्यूमरfile photo
Published on
Updated on

शांघाय : विविध यंत्रांचा वैद्यकीय क्षेत्रातील वापर सगळ्यांनाच ठाऊक आहे. अलीकडच्या काळात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचाही (एआय तंत्रज्ञान) या क्षेत्रात शिरकाव झालेला आहे. एआय/रोबोचा वापर करून चीनमध्ये डॉक्टरांच्या एका पथकाने रुग्णापासून तब्बल 5 हजार कि.मी. अंतरावरून शस्त्रक्रिया केली आहे. महत्त्वाचे म्हणजे ती यशस्वी ठरली आहे.

शांघाय चेस्ट हॉस्पिटलमध्ये सर्जनने आपल्या सहकार्यांसह हे रिमोट ऑपरेशन पार पाडले. रुग्णाच्या फफ्फुसातून यशस्वीरीत्या ट्यूमर काढला. शस्त्रक्रियेदरम्यान सर्जन शांघायमध्ये होते, तर रुग्ण आणि सर्जिकल रोबो शिंजियांगच्या काशगरमध्ये होता. दोन्ही ठिकाणांतील अंतर 5 हजार कि.मी. आहे. डॉ. ल्युओ किंगकॉन यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया पार पडली. ‘शंघाय डेली’ या दैनिकाच्या वृत्तानुसार रोबोच्या मदतीने शस्त्रक्रिया करणारे हे चीनमधील पहिले रुग्णालय ठरले आहे.

भारतातही सर्जिकल रोबो सिस्टीम

भारतातही अशाच पद्धतीची सर्जिकल रोबो सिस्टीम डॉ. सुधीर श्रीवास्तव यांच्या एसएसआय मंत्रा संस्थेने विकसित केली आहे. या रोबो यंत्रणेच्या मदतीने डॉक्टर रुग्णाजवळ प्रत्यक्ष हजर न राहताही शस्त्रक्रिया करू शकतील. भारतात रोबोच्या मदतीने 40 कि.मी. अंतरावरील रुग्णावर शस्त्रक्रिया झालेली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news