राष्‍ट्राध्‍यक्ष ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकन नागरिक पुन्‍हा उतरले रस्त्यांवर!

वॉशिंग्टन, न्यू यॉर्कसह विविध शहरांमध्‍ये तीव्र निदर्शने
Anti-Trump protests across the US
राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प यांच्‍या धोरणांविरुद्ध अमेरिकेतील नागरिक शनिवारी पुन्‍हा एकदा रस्‍त्‍यावर उतरले.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प ( Donald Trump )यांच्‍या धोरणांविरुद्ध अमेरिकेतील नागरिक शनिवारी पुन्‍हा एकदा रस्‍त्‍यावर उतरले. न्यू यॉर्क, वॉशिंग्टनसह शेकडो शहरांमध्ये हजारो निदर्शकांनी डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या कठोर धोरणांविरुद्ध मोठे निदर्शने केली, असे वृत्त 'एएफपी'ने दिले आहे. (Anti-Trump protests across the US)

'अमेरिकेत राजेशाही नाही'

न्यू यॉर्क शहरातच्‍या शहराच्या मुख्य ग्रंथालयाबाहेर हजारो नागरिक जमले. यावेळी त्‍यांनी आपल्‍या हातात "अमेरिकेत राजेशाही नाही", "अत्याचाराचा प्रतिकार करा" अशा घोषणा लिहिलेले फलक घेतले होते. यावेळी अनेकांनी ट्रम्‍प यांच्‍या स्‍थलांतर धोरणांवर तीव्र रोष व्‍यक्‍त केला.

'घटनात्‍मक तत्त्वांनाच कमकुवत करण्‍याचा प्रयत्‍न'

वॉशिंग्टनमध्ये निदर्शकांनी ट्रम्प प्रशासनाकडून घटनात्मक तत्त्वांनाच कमकुवत करत असल्‍याचा आरोप केला. प्रशासन कायद्याच्या राज्याच्या कल्पनेवर आणि अमेरिकेमध्‍ये लोकांवरीy अत्‍याचार थांबवावेत, अशी मागणी निदर्शकांनी केली. तसेच पॅलेस्टिनी समर्थक विद्यार्थी निदर्शक महमूद खलील यांच्या सुटकेची मागणी करणारे फलक हातात नागरिकांनी हाती घेतले होते.

'ट्रम्प हिटलरपेक्षा किंवा इतर फॅसिस्टांपेक्षा खूपच मूर्ख'

यावेळी 'एपीएफ'शी बोलताना ७३ वर्षीय कॅथी व्हॅली म्हणाल्‍या की, "आपण सारेच धोक्‍याच्‍या वातावरणात आहोत. माझ्‍या पालकांनी मला अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या सत्तेत येण्याची कथा सांगितली होती. सध्‍या ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेतील घटनांचे त्‍याचेच प्रतिध्वनी आहेत. ट्रम्प हिटलरपेक्षा किंवा इतर फॅसिस्टांपेक्षा खूपच मूर्ख आहेत. त्यांची स्वतःची टीम विभागली गेली आहे."

'आता गप्प बसू शकत नाही'

टेक्सासमधील गॅल्व्हेस्टन येथेही ट्रम्‍प यांच्‍याविरोधात नागरिक रस्‍त्‍यावर उतरले. यावेळी लेखिका पॅट्सी ऑलिव्हर, ६३, म्हणाल्या, मी चौथ्‍यांदा ट्रम्‍प यांच्‍या धोरणांविरोधात निदर्शने करत आहे. आता मी पुढच्या निवडणुकीची वाट पाहत आहे; पण आता आपण इतके गमावले आहे की आपण आता गप्प बसू शकत नाही.

सॅन फ्रान्‍सिस्‍कोमध्‍ये काही निदर्शकांनी अमेरिकाचा ध्वज उलटा फडकावला

सॅन फ्रान्सिस्कोच्या समुद्रकिनाऱ्यावरील वाळूवर शेकडो नागरिकांनी ट्रम्‍प सरकारविरोधात घोषणा लिहिल्‍या. काही निदर्शकांनी अमेरिकन ध्वज उलटा फडकावला, जो संकटाचे पारंपारिक प्रतीक मानला जातो.

'50501' गटाकडून निदर्शनांचे आयोजन

'50501' नावाच्या या गटाने याचा अर्थ ५० राज्यांमध्ये ५० निदर्शने आणि एक आंदोलन असा आहे. देशभरात सुमारे ४०० निदर्शने करण्याचे नियोजन असल्याचे आयोजकांनी सांगितले. यामध्‍ये लाखो लोकांचा सहभाग अपेक्षित होता; परंतु ५ एप्रिल रोजी झालेल्या 'हँड्स ऑफ' निदर्शनांच्या तुलनेत यावेळी गर्दी कमी होती, असेही निरीक्षण काहींनी नोंदवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news