पुढारी ऑनलाईन
'आपल्याला नक्की काय हवे आहे, ते लोकांना ठाऊक नसते, त्यामुळे आपण सादर केलेल्या उत्पादनात लोकांना आपल्या गरजा स्पष्ट दिसतात' उद्योग क्षेत्रात नव्याने येणाऱ्या आणि सध्या स्थानिक असणाऱ्या पण, व्यवसाय वाढवू पाहणाऱ्या नवउद्योजकांना मार्गदर्शक ठरणारा हा विचार आहे 'ॲपल'चे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांचा. स्टीव्ह जॉब्स यांचे जीवनाविषयीचे महत्वाचे विचार आणि त्यांचे आत्मचरित्र हे तरूणांना प्रेरणादायी ठरतं. पण, तुम्हलाही स्टीव्ह जॉब्स यांच्यासारखेच यशस्वी व्हायचे असेल तर त्यांचा 'यशस्वी उद्योग मंत्रा' नक्की वाचला पाहिजे.
लोकांना काय पाहिजे, यापेक्षा त्यांनी काय वापरले पाहिजे, ते तयार करा आणि त्यांना त्याची सवय लावा
आपले उत्पादन ग्राहकांच्या हाती जाण्यापूर्वी ते विविध कसोटयांवर काटेकोरपणे तपासून घेतले पाहिजे
बाजारात येणारे उत्पादन हे अत्यंत उत्तम दर्जाचेच असायचे. ते उत्तम दर्जाचेच असले पाहिजे असा त्यांचा ठाम आग्रह असे
वैयक्तिक संगणक त्यांनी अधिक देखणा व स्मार्ट तर केलाच, पण त्याची रचना करताना लोकांच्या गरजांना केंद्रस्थानी ठेवले
आयफोन आणि आयपॅडचे निर्माते स्टीव्ह यांना 'आय-कार' तयार करायची होती. मात्र, त्यांच्या निधनामुळे हे स्वप्नच राहिले
नवीन काहीतरी बाजारात आणले की प्रथम उत्सुकतेपोटी ग्राहक ते विकत घेतो आणि भविष्यात त्याला त्याची सवय लागते, असा विचार केल्याशिवाय कोणतेही संशोधन होऊ शकत नाही, जगण्यासाठी प्रेरणादायी ठरणारे स्टीव्ह जॉब्स यांचे विचार…
'तुम्ही जे काम करता त्यावर प्रेम करा..' असा संदेश देणाऱ्या स्टीव्ह जॉब्ज या अवलियाची आज जन्मदिन. 'स्टीव्ह जॉब्स' हा हयात असताना तरूणांना जितकी प्रेरणा द्यायचे तितकीच ते आता त्याच्या जीवनचरीत्र आणि विचारांमधून देतात. स्टीव्ह यांच्या जाण्यानंतरही त्यांच्या कंपनीने नाविन्य आणि विश्वासार्हता जपली आहे. म्हणूनच आज ग्राहक 'ॲपल' ब्रॅण्डसाठी तासंतास वाट पाहत रांगेत उभे असतात. स्टीव्ह जॉब्स आता आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आज अनेक तरूण नव्या स्वप्नांना साद घालत आहेत. पाहुयात स्टीव्ह जॉब्स यांचे १० विचार..
भुकेले रहा; असमाधानी रहा
तुमचं काम हेच तुमच्या आयुष्यातील सर्वाय मोठा भाग असते. त्यावर तुमचा विश्वास असेल, आवड असेल तर तुम्ही ते चांगले करु शकता आणि खऱ्या अर्थाने त्यातून समाधान मिळेल. तुम्हाला अजुनही वाटत नसेल की तुम्ही समाधानी नाही आहात तर काम शोधत रहा एकच न आवडणारी गोष्ट करु नका.
आपल्या मनाचे ऐकून त्यानुसार वाटचार करण्याचे धाडस असायला हवे. तुमच्याकडे वेळ मर्यादीत आहे त्याचा अपव्यय दुसऱ्यासाठी करु नका. इतर लोक काय म्हणतात याचा विचार करुन जगण्याची आवश्यकता नाही. तुमच्या आतला आवाज त्यासाठी दाबून ठेवलात तर कधीच यशापर्यंत पोहचता येणार नाही.
व्यवसाय हा एकट्याने करणे शक्य नाही. त्यासाठी एका टीमची गरज असते.
जर तुमच्याकडे नवनिर्मितीचा ध्यास असेल तरी तुमच्याकडे प्रत्येकाप्रमाणे अनुभवाची शिदोरी असायालाच पाहिजे असे काही नाही.
कोणालाही मृत्युला सामोरे जायची इच्छा नाही. स्वर्गात जायचं आहे म्हणणाऱ्यांना देखील मृत्यू नको आहे तरीही सर्वांना मृत्यू अटळ आहे. असं म्हणतात की, मृत्यूनंतर आत्मा शरीर बदलतो यातून आपण जुनं सोडून नव्याचा स्वीकार करायला शिकलं पाहिजे.
तुम्हाला जे करायला आवडतं तेच करा.
नवीन उपक्रम एक नेता आणि एक अनुयायी यांच्या दरम्यान फरक ओळखतो
गुणवत्तेचे एक मापदंड व्हा, काही लोकांचे असे वातावरण नसते जिथे उत्कृष्टतेची अपेक्षा केली जाते.
काहीवेळा जीवनात अनेक कठीण प्रसंग येतात. तेव्हा तुमचा स्वतर:वरील विश्वास गमावू नका.
माझ्या आवडत्या गोष्टींची किंमत पैशात करत येत नाही. आपल्या सर्वांजवळ असणारी वेळ सर्वात मैल्यवान आहे हेच स्पष्ट आहे.
डिझाईन म्हणजे केवळ बाह्यरूप नसून ते अंतर्गतही असते. एखाद्या वस्तू अथवा गोष्टीचे डिझाईन कसे आहे व ते कसे वाटते यावर अवलंबून नसून ती वस्तू कसे काम करते म्हणजेच डिझाईन होय.
हा तंत्रज्ञानातील विश्वास नसून लोकांवरील विश्वास आहे.
ज्यांना जगातील सर्वात चांगल्या गोष्टी बनवायच्या आहेत त्यांनाच आम्ही काम देतो.