US Aircraft Destroyed | दोन अमेरिकन विमानांसह हेलिकॉप्टर्सही केली नष्ट

इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डचा दावा
US Aircraft Destroyed |
तेहरान : बेपत्ता झालेल्या अमेरिकन लढाऊ विमानातील कर्मचार्‍याचा शोध घेणारे अमेरिकन विमान नष्ट करण्यात आल्याचा दावा इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस्ने केला आहे. या विमानाचे अवशेष.
Published on
Updated on

तेहरान; वृत्तसंस्था : अमेरिकन रेस्क्यू ऑपरेशन (बचाव मोहीम) दरम्यान अमेरिकेची 2 हेलिकॉप्टर आणि 2 वाहतूक विमाने नष्ट केली आहेत, असा दावा इराणने केला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) नुसार, ही कारवाई इस्फहानच्या दक्षिण भागात करण्यात आली.

आयआरजीसीने म्हटले आहे की, अमेरिकन सैन्य कोसळलेल्या विमानाच्या वैमानिकाला वाचवण्यासाठी मोहीम राबवत होते. त्याचवेळी त्यांच्या विमानांना लक्ष्य करण्यात आले. इराणच्या दाव्यानुसार, या कारवाईत अमेरिकेची दोन सी-130 वाहतूक विमाने आणि दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर नष्ट करण्यात आली असून अमेरिकेची बचाव मोहीम अपयशी ठरली. यापूर्वी इराणी माध्यमांनी एक विमान पाडल्याचे म्हटले होते; परंतु आता आयआरजीसीने चार विमाने नष्ट केल्याचा दावा केला आहे.

विमानाचे अवशेष दाखवणारे फोटो शेअर

इराण संसदेचे सभापती मोहम्मद बाकर गालिबाफ यांनी ‘एक्स’वर एका अमेरिकन विमानाचे कथित अवशेष असल्याचा फोटो शेअर केला आहे. अमेरिकेच्या बचाव मोहिमेत सहभागी असलेले विमान पाडल्याचा जो दावा इराणने केला होता, त्याच्याशी संबंधित हा फोटो असल्याचे सांगितले जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news