

Alex Honnold जगातील अव्वल फ्री-सोलो गिर्यारोहक ॲलेक्स हॉनोल्ड (Alex Honnold) याने अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली आहे. नुकताच त्याने तैवानमधील प्रसिद्ध 'तैपेई 101' (Taipei 101) या गगनचुंबी इमारतीवर कोणतीही सुरक्षा साधने किंवा दोरखंड न वापरता यशस्वी चढाई केली आहे. एके ठिकाणी तर त्याने आपले दोन्ही हात सोडले, आणि केवळ पायांच्या जोरावर तो थांबला. या बिल्डींगवर चढाई करताना अलेक्सला पाहणे हे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवणारे होते. अनेकांनी तो थरार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.
ॲलेक्स हा फ्री-सोलो गिर्यारोहक आहे 25 जानेवारी रोजी त्यांने एक अनोखा उपक्रम केला. तैवानची राजधानी तैपेई येथील ॲलेक्सने १०१ मजल्यांची (५०८ मीटर/१,६६७ फूट) ही इमारत अवघ्या १ तास ३१ मिनिटांत सर केली. हे शिखर सर करताना कोणत्याही प्रकारचे दोरखंड हार्नेस किंवा सुरक्षा जाळी वापरली नव्हती. केवळ आपले हात आणि पायांच्या जोरावर त्याने हे यश मिळवले.
एक ठिकाणी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला
चढाई दरम्यान एका टप्प्यावर, जिथे इमारतीच्या रचनेत पाय अडकवण्यासाठी किंवा आधार घेण्यासाठी जागा होती, तिथे ॲलेक्सने त्याचे दोन्ही हात सोडून दिले. त्याने केवळ आपल्या पायांच्या आणि गुडघ्यांच्या ताकदीवर स्वतःचा तोल सावरला आणि हवेत हात मोकळे सोडून विश्रांती घेतली.हे इमारतीच्या मध्यभागी असलेल्या 'बांबू बॉक्स' (Bamboo Boxes) सारख्या रचनेच्या एका कोपऱ्यावर घडले. यावेळी अनेकांनी श्वास रोखून धरला त्याने दोन्ही हात सोडून आपल्या पाठीवरील बॅगमधून पावडर हाताला लावली. ही संपूर्ण मोहीम Netflix वर 'Skyscraper Live' या नावाने जगभरात 'लाईव्ह' दाखवण्यात आली. खराब हवामानामुळे ही मोहीम एक दिवस पुढे ढकलण्यात आली होती.
यापूर्वी २००४ मध्ये 'फ्रेंच स्पायडरमॅन' मानल्या जाणाऱ्या अलेन रॉबर्टने या इमारतीवर चढाई केली होती, पण त्यांनी सुरक्षा साधनांचा वापर केला होता आणि त्यांना ४ तास लागले होते. ॲलेक्सने त्यापेक्षा निम्म्याहून कमी वेळेत हे अंतर पार केले.
इमारत चढाईसाठी अवघड
तैवानमधील ही इमारत रिकाम्या हातांनी चढण्यासाठी खूप कठीम मानली जाते. या तैपेई 101 ची रचना बांबूच्या झाडासारखी असून त्यात 'बांबू बॉक्सेस' सारखे ८ विभाग आहेत. या प्रत्येक विभागाच्या टोकावर असलेल्या बाल्कनीतून बाहेरच्या बाजूने चढणे अत्यंत कठीण आहे. येथून हात निसटला तर थेट मृत्यूचं
ॲलेक्स हॉनोल्ड हा २०१७ मध्ये 'एल कॅपिटन ही ९०० मीटरची सरळ भिंत कोणतीही सुरक्षा न घेता चढल्यामुळे जगप्रसिद्ध झाला होता. त्याच्या त्या मोहिमेवर 'Free Solo' हा ऑस्करविजेता माहितीपटही बनला आहे. आता तैपेई 101 सर करून त्याने शहरी गिर्यारोहणातही (Urban Climbing) आपला दबदबा निर्माण केला आहे.