Alberta separatist campaign | कॅनडातून फुटून अल्बर्टा वेगळा देश होण्याच्या मार्गावर

Alberta separatist campaign  |
Alberta separatist campaign | कॅनडातून फुटून अल्बर्टा वेगळा देश होण्याच्या मार्गावरFile Photo
Published on
Updated on

ओटावा; वृत्तसंस्था : कॅनडामध्ये पश्चिमेकडील अल्बर्टा प्रांतात स्वतंत्र देश बनविण्याची मागणी पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. अल्बर्टातील फुटीरवादी गटांनी स्वतंत्र राष्ट्रासाठी जनमत चाचणी (रेफरेंडम) घेण्याची मागणी करत मोठ्या प्रमाणावर लोकसमर्थन मिळवल्याचा दावा केला आहे. या आंदोलनाच्या नेत्यांनी सुमारे तीन लाख स्वाक्षर्‍या निवडणूक अधिकार्‍यांकडे जमा केल्याचे सांगितले असून, जनमत चाचणीसाठी आवश्यक असलेल्या 1.78 लाख स्वाक्षर्‍यांपेक्षा हा आकडा खूप मोठा आहे.

फुटीरवादी चळवळीचे नेते मिच सिल्वेस्ट्रे यांनी हा ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगत, आता आमची लढाई पुढच्या टप्प्यात पोहोचली आहे, असे म्हटले आहे. तथापि, निवडणूक आयोगाकडून या स्वाक्षर्‍यांची पडताळणी होणे आवश्यक आहे. सर्व कायदेशीर अडथळे दूर झाल्यास 19 ऑक्टोबर रोजी अल्बर्टाच्या स्वातंत्र्याबाबतही मतदान होऊ शकते. अल्बर्टाच्या प्रीमियर डेनिएल स्मिथ यांनी स्पष्ट केले आहे की, स्वाक्षर्‍या वैध ठरल्यास मतदान प्रक्रियेला परवानगी देऊ, असे म्हटले आहे. मात्र, त्या स्वतः कॅनडापासून विभक्त होण्याच्या बाजूने नाहीत.

यापुर्वी येथील फ्रेंचभाषिक क्यूबेक प्रांताने यापूर्वी दोनदा कॅनडापासून वेगळे होण्यासाठी जनमत चाचण्या घेतल्या होत्या. 1980 मध्ये पहिली जनमत चाचणी झाली होती. त्यात नागरिकांनी विभाजनाला नकार दिला. 1995 मधील दुसरी जनमत चाचणी अत्यंत चुरशीची ठरली होती.

अल्बर्टामध्ये नाराजी का?

* हा कॅनडातील तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादनाचा प्रमुख प्रांत. 84 टक्के तेल अल्बर्टातून मिळते

* मोठ्या प्रमाणावर महसूल देऊनही त्याचा जास्त फायदा कॅनडाच्या इतर भागांना मिळतो. निर्णयात मात्र अल्बर्टाच्या मताला डावलले जात असल्याची भावना

* पर्यावरण आणि हवामानविषयक नियमांमुळे तेल आणि वायू उद्योगाला फटका बसत असल्याने असंतोष

* अल्बर्टाची राजकीय विचारसरणी कॅनडाच्या इतर भागांच्या तुलनेत अधिक पुराणमतवादी

* केंद्रात दीर्घकाळ उदारमतवादी विचारसरणीचे वर्चस्व

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news