अमेरिकेचा सीरियावर हल्ला; राजधानीत स्फोटाचे आवाज

दमास्कस : पुढारी ऑनलाईन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियावर हल्ला करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर काहीच वेळात सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये हवेत स्फोट झाले. एजन्स फ्रान्स प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेने ब्रिटन आणि फ्रान्ससोबत मिळून सिरियाच्या बशर अल असद सरकारविरोधात मोहिम सुरु केली आहे. असद सरकारने केलेल्या सीरियातील रासायनिक हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात हिंसाचार केल्याचे म्हटले होते. त्यांनतर सीरियाच्या पूर्व, पश्चिम भागात हवाई हल्ले करण्यात आले आहेत.

रासायनिक हल्ला: मुलांचे हृदय पिळवटून टाकणारे फोटो व्हायरल

सीरियातील सरकारी वाहिन्यांवरुन देशावर हल्ला केल्याच्या बातम्या दाखवल्या जात आहेत. सीरियावर हल्ला करण्याचा इशारा देताना ट्रम्प यांनी म्हटले होते की, फ्रान्स आणि ब्रिटन या देशांसोबत ही मोहिम पूर्ण केली जाणार आहे. यासाठी दोन्ही देशांचे आभार आहे. सीरियातील सरकारकडून होणारे रासायनिक हल्ले रोखण्यासाठी सीरियावरच हल्ला करणे हाच पर्याय असल्याचे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते. याबाबत फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अमेरिकेसोबत सीरियावर संयुक्त हल्ल्याच्या हालचाली सुरु असल्याचे म्हटले होते. 

गेल्या आठवड्यात पूर्व घौटामध्ये झालेल्या रासायनिक हल्ल्यात ८० नागरिकांचा मृत्यू झाला होता. बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या घौटा भागातील या हल्ल्यात रासायनिक अस्त्रांचा वापर करण्यात आल्‍याचा आरोप करण्यात आला होता. परंतु, सीरियातील सरकारी माध्यमांनी हे आरोप फेटाळले होते

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news