पीएम मोदींनी अर्पण केलेला देवी कालीचा मुकूट चोरीला, बांगला देशातील घटना

Bangladesh : ५१ शक्तिपीठांपैकी एक मानल्या जाणाऱ्या जशोरेश्वरी मंदिरातील घटना
Bangladesh, Goddess Kali, Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगला देश दौऱ्यादरम्यान काली देवीला मुकूट अर्पण केला होता. (file photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ५१ शक्तिपीठांपैकी एक मानल्या जाणाऱ्या बांगला देशातील सतखीरा येथील जशोरेश्वरी मंदिरातील काली देवीचा (Goddess Kali) सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी बांगला देश दौऱ्यादरम्यान देवीला हा मुकूट अर्पण केला होता. जशोरेश्वरी काली मंदिर हे ५१ शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. हे मंदिर ४०० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते.

जशोरेश्वरी मंदिराचे पुजारी पूजेनंतर निघून गेल्यानंतर काही वेळातच गुरुवारी दुपारी सोन्या- चांदीने मढवलेला मुकुट चोरीला गेला. सफाई कर्मचाऱ्यांना नंतर देवीच्या डोक्यावरील मुकुट गायब असल्याचे दिसून आले, असे वृत्त बांगला देशी वृत्तपत्र द डेली स्टारने दिले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी मार्च २०२१ मध्ये बांगला देश दौऱ्यादरम्यान जशोरेश्वरी मंदिराला भेट देऊन पूजा केली. त्यांनी देवीला मुकुट अर्पण केला होता. या मंदिराची पिढ्यानपिढ्या जे कुटुंब देखभाल करत आहे; त्या कुटुंबातील सदस्य ज्योती चट्टोपाध्याय यांनी बांगला देशातील मीडियाशी बोलताना सांगितले की, देवीचा मुकुट हा सोन्या- चांदीने मढवलेला होता.

जेशोरेश्वरी मंदिर ५१ शक्तीपीठांपैकी एक

हिंदू धर्मशास्त्रामध्ये, जेशोरेश्वरी मंदिर भारत आणि शेजारील देशांतील ५१ शक्तीपीठांपैकी एक म्हणून मानले आहे. या मंदिरातील मुकूट चोरीच्या घटनेची भारताने गंभीर दखल घेतली आहे. भारताने बांगला देश सरकारला या प्रकरणाची चौकशी करून चोरीला गेलेला मुकुट परत मिळवून देण्याची विनंती केली आहे.

ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाने व्यक्त केली चिंता

ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, "आम्ही या घटनेबद्दल चिंता व्यक्त करतो आणि बांगला देश सरकारला या घटनेची चौकशी करुन मुकुट परत मिळवून देण्यासाठी आणि आरोपींवर कारवाई करण्याची विनंती करतो."

जशोरेश्वरी मंदिराची बाराव्या शतकात उभारणी

सतखीरा येथील ईश्वरीपूर येथे असलेल्या जशोरेश्वरी मंदिराची उभारणी बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात अनारी नावाच्या ब्राह्मणाने केली असल्याचे मानले जाते. त्यांनी जशोरेश्वरी पीठासाठी १०० दरवाजे असलेले मंदिर बांधले. त्यानंतर तेराव्या शतकात लक्ष्मण सेन यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तर सोळाव्या शतकात राजा प्रतापादित्या यांनी या मंदिराची पुनर्बांधणी केली.

Bangladesh, Goddess Kali, Prime Minister Narendra Modi
आसियान देशांमधील एकता खूप महत्‍वाची आहे : पंतप्रधान मोदी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news