AI : 9 ते 5 ची नोकरी 2034 पर्यंत नामशेष होणार! LinkedIn सह-संस्थापक रीड हॉफमन यांची भविष्यवाणी

रिज्यूमे ही संकल्पना होणार कालबाह्य, ऑनलाइन पोर्टफोलियो हाच नवा सीवी
LinkedIn Reid Hoffman

पुढारी ऑनलाईन डेस्क : लिंक्डइनचे सह-संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष रीड गॅरेट हॉफमन यांनी मोठी भविष्यवाणी करत वर्ष 2034 पर्यंत 9 ते 5 वेळेतील नोकऱ्या या कृत्रिम बुद्धिमत्ता-चालित कर्मचारी घेतील, असे धक्कादायक विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे त्यांचे यापूर्वीचे सर्व अंदाज खरे ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या या नव्या वक्तव्याकडे सर्वजण गांभिर्याने पाहत आहेत. उद्योजक आणि गुंतवणूकदार नील टापारिया यांनी हॉफमन यांची व्हायरल क्लिप सोशल मीडिया वेबसाइटवर शेअर केली आहे.

यापूर्वी, हॉफमन यांनी 1997 मध्ये सोशल मीडियाच्या उदयाचा अंदाज वर्तवला होता. सोशल मीडिया नेटवर्क्समुळे जग बदलेल असे भाकीतही केले होते. त्यानंतर त्यांनी AI क्रांतीचा घटक असणा-या ChatGPT संदर्भात विचार मांडले होते. ते तंतोतंत खरे होताना दिसत आहेत.

दरम्यान, ‘गिग इकॉनॉमी रिव्होल्यूशन’ येत आहे आणि ती आपल्या विचारापेक्षा मोठी आहे, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, एका दशकात, 50% कर्मचारी फ्रीलांसर असतील आणि पारंपरिक कर्मचा-यांपेक्षा अधिक काम करतील.

याचबरोबर लवकरच रिज्यूमे ही संकल्पना कालबाह्य ठरणार असून कर्मचा-यांचा ऑनलाइन पोर्टफोलियो हाच त्यांचा नवा सीवी असेल, असेही भाकित केले आहे. कंपन्या डिग्री किंवा जॉब टायटलच्या आधारे नाही, तर स्किलनुसार कर्मचा-यांना प्राधान्य देईल. हा एक असा व्यक्तिगत ब्रँड आहे ज्याच्याबाबत नव्या डिजिटल युगात प्रत्येकाला सिद्ध करावे लागेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news