ONLYFANS च्या सीईओ बनल्या मुंबईच्या आम्रपाली गन | पुढारी

ONLYFANS च्या सीईओ बनल्या मुंबईच्या आम्रपाली गन

पुढारी ऑनलाईन डेस्क : अॅडल्ट कंटेंट क्रिएटरसाठी असलेल्या OnlyFans या प्लॅटफॉर्मचे संस्थापक टीम स्टोकली यांनी आम्रपाली गन यांच्याकडे CEO ची पदाची जबाबदारी सोपवली आहे. (ONLYFANS) विशेष म्हणजे ३६ वर्षीय आम्रपाली गन ह्या मुंबईच्या आहेत. त्यांचा जन्म मुंबईत झाला आहे.

३८ वर्षीय स्टोकली, यांनी २०१६ मध्ये OnlyFansची स्थापना केली होती. आता OnlyFans च्या सीईओपदी आम्रपाली गण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल स्टोकली यांनी गण यांचे सोशल मीडियावर अभिनंदन केले आहे. यावेळी स्टोकली म्हणाले की, गण माझी एक चांगली मैत्रीण आहे आणि सहकारी आहे. ती काम करण्यास खूप उत्साही असते.

गण यांनी कंपनीच्या सीईओपदी नियुक्ती झाल्यावर म्हटले आहे की, माझ्या आयुष्यातील हा मोठा क्षण आहे. मला मोठ्या कंपनीचा पदभार स्वीकारण्यास मिळाला. यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते.

‘ONLYFANS च्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहीन’

गण यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ही जबाबदारी स्वीकारताना मला अभिमान वाटतो. मी कंपनीच्या आर्थिक प्रगतीसाठी कायम तत्पर राहीन, असे त्या म्हणाल्या. कंपनीच्या प्रत्येक सहकाऱ्यांसोबत मी जुळवून घेत उत्साहाने काम करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tim Stokely (@timstokely)

आम्ही जगातील सर्वात सुरक्षित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनण्यासाठी कार्यरत आहोत. गण यांनी फायनान्शियल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, स्टोकली नवीन प्रोजेक्टवर काम करण्यापुर्वी सुट्टीच्या आनंद घेणार आहेत.

स्टोकली यांनी पदभार सोडल्यानंतर पुढे ते कोणत्या पदावर राहून काम करणार याबाबत कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही.
जगभरातील १८ कोटी नोंदणीकृत असलेल्या ONLYFANS साइटवर लॉचिंगपासून ते कंपनीला उच्चस्थानी नेण्यापूर्यंत स्टोकली यांनी पाच वर्षे घालवली आहेत.

अवघ्या पाच दिवसांत आपल्या साईटवरून sexually explicit content मागे घेतल्याने चाहत्यांनी चांगलाच त्यांचा समाचार घेतला होता.
स्टोकली यांनी बँकांच्या दबावामुळे ही बंदी घातल्याचे सांगितले होते. त्यांनी दावा केला की कंपनीची खाती संपुष्टात आणली गेली आहेत आणि त्यांची सेवा वापरणार्‍या पोर्नोग्राफिक कंटेंट निर्मात्यांना पेमेंट हस्तांतरित करण्यासाठी संघर्ष केला गेला आहे.

Back to top button