पाकिस्तानमध्ये मोठी नैसर्गिक आपत्ती; विजांसह मुसळधार पाऊस, ४१ जणांचा मृत्यू | पुढारी

पाकिस्तानमध्ये मोठी नैसर्गिक आपत्ती; विजांसह मुसळधार पाऊस, ४१ जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. संपूर्ण अठवडाभर येथे वीज वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. संपूर्ण देशभरात सुरु असलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे ४१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, वीज पडून २८ लोकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे पुराचा धोका असल्याचा इशार दिलेला आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात या आपत्तीचा सर्वात मोठा फटका असल्याची माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा

Back to top button