नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन तैवानची राजधानी तैपेई बुधवारी जोरदार भूकंपाने हादरली. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.2 इतकी होती. भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. देशभरातील रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. हा भूकंप इतका शक्तिशाली होता की त्यानंतर जपानच्या दोन बेटांवर त्सुनामी आली.
तैवानच्या हुआलियनमधून भूकंपाची अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये इमारती कोसळताना दिसत आहेत. अनेक घरे आणि इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या आहेत. भूकंपामुळे तैवानमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यानंतर देशभरातील रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. या भूकंपाचे एक छायाचित्र सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पाच मजली इमारत झुकली आहे.
भूकंपामुळे अनेक शहरांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. अनेक लोक इमारतींमध्ये अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. तैवान, जपान आणि फिलीपिन्समध्ये त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. मात्र, या भूकंपात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.