

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॅनडाची दूरसंचार बेल कंपनीने 400 हून अधिक कार्मचाऱ्यांना व्हर्च्युअल ग्रुप मीटिंगमध्ये काढून टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. युनिफोर कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या युनियनने याबाबत माहिती दिली. या संघटनेने ही माहिती देताना "लज्जास्पद, घृणास्पद" अशा शब्दात निषेध व्यक्त केला. (Bell layoffs)
कामगार संघटनेने सांगितले की, दूरसंचार कंपनीने 10 मिनिटांच्या व्हर्च्युअल ग्रुप मीटिंगमध्ये काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना "अधिशेष" म्हणून घोषित केले आहे. तसेच कर्मचाऱ्यांना कोणालाही प्रश्न विचारण्याची परवानगी न देता सेवा समाप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. (Bell layoffs)
युनिफोर्सचे क्विबेक संचालक म्हणाले की, ज्यांनी या दूरसंचार आणि मीडिया दिग्गजांसाठी अनेक वर्षे सेवा दिली आहे, त्यांना गुलाबी स्लिप्ससह परतफेड केली जात आहे." कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या या प्रक्रियेनंतर हा विषय गंभीर बनला आहे.
बेल कंपनीने मात्र हे विधान नाकारले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, टाळेबंदीच्या प्रक्रियेबद्दल पाच आठवड्यांहून अधिक काळ युनियन नेतृत्वासोबत पारदर्शकता दाखवली आहे आणि त्यानंतर आपली जबाबदारी पूर्ण केली असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
हेही वाचा