Israel Hamas War: अन्नासाठी रांगेत उभ्या असलेल्या पॅलेस्टिनींवर इस्रायली सैनिकांचा गोळीबार; २० ठार; १५० जखमी

Israel Hamas War:
Israel Hamas War:
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन; Israel Hamas War: इस्रायलकडून करण्यात आलेल्‍या गोळीबारात अन्नाच्या मदतीच्या प्रतीक्षेत उभ्‍या असलेल्‍या २० लोकांचा मृत्‍यू झाला. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, या हल्ल्यात सुमारे २० लोक ठार झाले आणि १५० हून अधिक जखमी झाले. हा हल्ला गाझामधील कुवैती क्रॉसरोडवर झाला जेथे मदत ट्रक सहसा अन्न घेऊन येतात. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

इस्रायल-हमास युद्ध सुरू होऊन अनेक महिने उलटले आहेत. या दोन देशांच्या युद्धात गाझामधील मृतांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. गोळीबार आणि बॉम्बस्फोटात अनेक लहान मुलांसह नागरिक बळी पडत आहेत. गाझाला मदत म्हणून अन्न आणि जीवनावश्यक वस्तू पोहोचवल्या जात आहेत.

मृतांची संख्या वाढण्याची शक्‍यता

अल शिफा रुग्णालयाच्या आपत्कालीन युनिटचे डॉक्टर मोहम्मद गराब यांनी सांगितले की मृतांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे कारण आणखीन जखमी नागरिकांना रूग्‍णालयात पोहोचवले जात आहे.

सीएनएनच्या वृत्तानुसार, घटनास्थळावरील एका साक्षीदाराने सांगितले की, या गोळीबारात झनभर लोक मरण पावले आहेत, व्हिडिओमध्ये डझनभर मृतदेह घटनास्थळी पडलेले दिसून येत आहेत. पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने या सांगितले की, 'गाझामधील कुवैती क्रॉसरोडवर खाद्यान्नाच्या मदतीसाठी वाट पाहत असलेल्या नागरिकांच्या गटाला इस्रायली सैन्याने लक्ष्य केले आहे.

इस्रायलला धरले जबाबदार

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, या भागावर तोफखाना किंवा टँक फायर सदृश शस्‍त्राने हल्ला करण्यात आला. गाझा नागरी संरक्षण प्रवक्ते महमूद बस्सल यांनी गुरुवारी एका निवेदनात या हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार धरले, असे सीएनएनने वृत्त दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news