Qatar Court Verdict : भारतीय नौदलातील ८ माजी अधिकाऱ्यांना कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा; भारताने नोंदवला तीव्र आक्षेप | पुढारी

Qatar Court Verdict : भारतीय नौदलातील ८ माजी अधिकाऱ्यांना कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा; भारताने नोंदवला तीव्र आक्षेप

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय नौदलातील ८ माजी सैनिकांना कतारमधील स्थानिक न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. यानंतर पराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी (दि. २६) चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान यानंतर भारताकडून संबंधितांना सर्व प्रकारचे कायदेशीर सहाय्य देण्यात आहे. शिवाय इतर कायदेशीर पर्यायांचा शोध घेणे देखील सुरु असल्याचे पराराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. आमच्यासाठी ही केस अतिशय महत्वाची आहे. शिवाय, याबाबत कतारच्या सत्ताधाऱ्यांकडूनही याबाबत विचारणा करु, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. (Qatar Court Verdict)

मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले ८ दिग्गज भारतीय कोण आहेत?

कतारमध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या भारतीयांमध्ये नौदलातील ८ माजी सैनिकांचा समावेश आहे. १. माजी नौदल अधिकारी – कॅप्टन नवतेज सिंग गिल, २ कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, ३. कॅप्टन सौरभ वशिष्ट ४. कमांडर अमित नागपाल, ५. कमांडर तिवारी ६. कमांडर संजय गुप्ता ७. सैलर रागेश ८. कमांडर सुगुणाकर पाकला अशी मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या भारतीय नौदलातील माजी अधिकाऱ्यांची नावे आहेत. त्यांना ऑगस्ट २०२२ कतारच्या गुप्तचर यंत्रणेने ताब्यात घेतले होते. (Qatar Court Verdict)

निवृत्त कमांडर पूर्णेंदू तिवारी यांना २०१९ मध्ये ‘प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले होते. कतारमधील भारताच्या राजदूतांनी १ ऑक्टोबर रोजी तुरुंगात प्रवेश मिळवला आणि तुरूगांत असलेल्या भारतीयांची भेट घेतली. आठही जणांना ताब्यात घेऊन एकांतात ठेवण्यात आले आहे. (Qatar Court Verdict)

कोणत्या आरोपांखाली सुनावण्यात आली मृत्युदंडाची शिक्षा? (Qatar Court Verdict)

भारतीय नागरिकांना आणि अल दाहरा या कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना हेरगिरीच्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले होते. ऑगस्ट २०२२ पासून ते कतारमधील कोठडीत कैद आहेत. कतारच्या अधिकाऱ्यांनी भारतीय नागरिकांवरिल आरोप सार्वजनिक केले नाहीत. भारत सरकार सुनावण्यात आलेल्या निकालाचा तपशील मिळावा, यासाठी वाट पाहत आहे. (Qatar Court Verdict)

हेही वाचलंत का?

Back to top button