नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा आज (मंगळवार) पहाटे ४.१७ वाजता नेपाळच्या काठमांडू येथे ४.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप Nepal Earthquake झाला. दरम्यान दोन दिवसांपूर्वीच रविवारी देखील ६.१ रिश्टर स्केलचा शक्तीशाली भूकंप झाला होता. या भूकंपाच्या धक्क्याने नेपाळची राजधानी काठमांडू हादरले. या भूकंपामुळे २० घरांचे मोठे नुकसान झाले. यामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली.
याआधी २०१५ साली आलेल्या शक्तीशाली भूकंपाच्या Nepal Earthquake कटू आठवणी आजही लोकांमध्ये ताज्या आहेत. यामध्ये जवळपास ९ हजार लोकांचा बळी गेला होता. राष्ट्रीय भूकंप मापन केंद्राच्यावतीने दिलेल्या माहितीनुसार सकाळी ७ वाजून ३९ मिनिटांनी भूकंप झाला होता. या भूकंपाचे केंद्र धाडिंग जिल्ह्यात होता.