Mia Khalifa : पॅलेस्टाईनचे समर्थन भोवले; मिया खलिफाची ‘त्या’ नोकरीवरून हकालपट्टी | पुढारी

Mia Khalifa : पॅलेस्टाईनचे समर्थन भोवले; मिया खलिफाची ‘त्या’ नोकरीवरून हकालपट्टी

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल-हमास संघर्षादरम्यान पॅलेस्टाईनला पाठिंबा दिल्याने अभिनेत्री मिया खलिफाला नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. कॅनेडियन ब्रॉडकास्टर आणि रेडिओ होस्ट टॉड शापिरो यांच्यासोबत ती काम करत होती. आता शोसोबतच्या करारातून तिला काढून टाकल्यामुळे तिच्यावर बेरोजगारीचे संकट आले आहे. खलिफाने युद्धग्रस्त पॅलेस्टाईनसाठी आपली एकजूट दाखविल्यामुळे तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. शनिवार (७ ऑक्टोबर) सकाळी पॅलेस्टाईन दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत १७०० लोकांचा मृत्यू झाला आहे. हमासच्या या हल्ल्यावर अनेक जण टीका करत आहेत, पण काही लोक पॅलेस्टाईनच्या बाजूनेही उभे आहेत. त्यापैकी एक म्हणजे मिया खलिफा, जिने पॅलेस्टाईनशी एकजुटीचे वक्तव्य केले. तिच्या पॅलेस्टाईन समर्थनामुळे तिला आता नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. तिने केलेल्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

मिया खलिफा ही रेड लाइट हॉलंडचे सीईओ टॉड शापिरो यांच्या कंपनीत काम करत होती. शापिरो यांची कंपनी अमेरिका आणि युरोपमध्ये मशरुम होम ग्रोथ किटचे उत्पादन आणि विक्री करते. याच वर्षी मियाला शापिरो यांच्या या कंपनीत काम करण्याची संधी मिळाली. मिया शापिरो यांच्या कंपनीचा ऑनलाईन व्यवसाय वाढवण्यावर काम करत होती. मात्र मियाने केलेल्या पोस्टनंतर आता शापिरो यांनी मियाला कंपनीतून काढत असल्याचे सोशल मीडियावर घोषित केले. या पोस्टनंतर मियाच्या नोकरीवर गदा आल्याचे स्पष्ट झाले आहे.

इस्रायल विरुद्ध हमासवरील पोस्टमुळे सीईओ टॉड शापिरो यांना धमकी देण्यात आल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. यानंतर त्यांनी सोशल मीडियावरच मिया खलिफाला नोकरीतून काढून टाकल्याची घोषणा केली. यामुळे दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली पण मियाने आता तिची नोकरी गमावली आहे.

मिया खलिफाची पॅलेस्टाईन समर्थनातील पोस्ट

मिया खलिफाने इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये तिने लिहिले होते की, “तुम्ही पॅलेस्टाईनमधील परिस्थिती पाहून देखी पॅलेस्टिनींच्या विरोधात असाल तर तुम्ही वर्णभेदाच्या चुकीच्या बाजूने आहात आणि इतिहास हे तुम्हाला वेळोवेळी दाखवून देईल.”

Back to top button