इम्रान खान यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ | पुढारी

इम्रान खान यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानच्या विशेष न्यायालयाने आज (दि. २६) माजी पंतप्रधान इम्रान खान यांची सायफर प्रकरणी आणखी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी वाढवली आहे. यामुळे त्‍यांच्‍या अडचणीत वाढ झाली आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे तोशाखान प्रकरणात न्यायालयीन कोठडीत होते. त्यानंतर दि. २९ ऑगस्ट रोजी त्यांना इस्लामाबाद न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. परंतु त्यांची सुटका होताच, काही तासांत सायफर प्रकरणात त्‍यांना अटक करण्यात आली हाेती. या प्रकरणी  १० ऑक्टोबरपर्यंत त्यांच्‍या न्‍यायालयीन काेठडीत वाढ करण्यात आली आहे.

Back to top button