

काठमांडू; वृत्तसंस्था : पूर्व नेपाळमधील इलाम येथे गेल्या 24 तासांत भूस्खलन आणि पुरामुळे किमान 63 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती अधिकार्यांनी दिली.
कोशी प्रांत पोलिस कार्यालयाचे प्रवक्ते, एसएसपी दीपक पोखरेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये सूर्योदय नगरपालिकेतील पाच, मंगसेबुंग नगरपालिकेतील तीन, इलाम नगरपालिकेतील सहा, देउमाई नगरपालिकेतील तीन आणि फाकफोकथुम गाव परिषदेतील एका व्यक्तीचा समावेश आहे. आम्ही नुकसानीचा आढावा घेत असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसानंतर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने, नेपाळ लष्कर, सशस्त्र पोलिस दल आणि नेपाळ पोलिस या तिन्ही दलांच्या सुरक्षा तुकड्यांना बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आले आहे.