Tulsi Bhai Name of WHO Chief : डब्लूएचओ प्रमुखांना ‘तुलसीभाई’ नाव आवडले; म्हणाले, मला मिळालेल्या ‘या’ नावामुळे आनंद झाला | पुढारी

Tulsi Bhai Name of WHO Chief : डब्लूएचओ प्रमुखांना 'तुलसीभाई' नाव आवडले; म्हणाले, मला मिळालेल्या 'या' नावामुळे आनंद झाला

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक टेड्रोस घेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांना ‘तुलसीभाई’ हे नविन नाव मिळाले आहे. भारत दौऱ्यावर आलेले आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांना मिळालेल्या या नावाबद्दल त्यांनी हे नाव मला खूप आवडले असल्याचे सांगतिले. त्यांनी हे नाव का आवडले याचे कारण देखील सांगतिले आहे. (Tulsi Bhai Name of WHO Chief )

जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक टेड्रोस घेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. टेड्रोस यांना बुधवारी (दि. १६) नवीन “गुजराती नाव” मिळाले आहे. “तुलसीभाई” असे हे नाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे नाव दिलेले आहे. माध्यमांशी संवाद साधत असताना ते म्हणाले की, मला तुलसीभाई म्हटल्याबद्दल आनंद झाला. मला हे नाव खूप आवडले आहे. हे नाव आवडण्यामागे एक महत्त्वपूर्ण कारण आहे असं देखील ते यावेळी म्हणाले. (Tulsi Bhai Name of WHO Chief )

WHO प्रमुखांना तुलसीभाई नाव का आवडले? (Tulsi Bhai Name of WHO Chief )

तुलसी ही एक औषधी वनस्पती आहे. या औषधी वनस्पतीचं नाव मला मिळाल्याने आनंद होत आहे. मी विशेषत: पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. तसेच त्यांनी माझा या वनस्पतीचे नाव देऊन गौरव केला.

पीएम मोदींकडून तुलसीभाईंचे स्वागत

गुजरातमधील गांधीनगर येथे ही परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. पंतप्रधान मोदींनी बुधवारी भारतातील तीन दिवसीय जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी त्यांचे स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारतात आपले स्वागत आहे! असं ट्विट करत पीएम मोदींनी त्यांचे स्वागत केले.

हेही वाचा

Back to top button