

Discover Ancient Human Skeletons
पुढारी ऑनलाईन डेस्क : युनायटेड किंगडमध्ये पुरातत्ववेत्त्यांनी केलेल्या एका संशोधनादरम्यान साऊथ वेल्स या भागात ४१ मानवी सांगाडे सापडले आहेत. यामध्ये बहूतेक सांगाडे हे स्त्रियांचे आहेत. हे सांगाडे इसवी सन ५०० ते ६०० सालादरम्यानचे असावेत असा अंदाज संशोधकांनी बांधला आहे. तसेच हे सांगाडे ‘मेडवेल’ (The Medieval Period) काळाच्या सुरवातीच्या टप्प्यातील असावेत. या काळाला अंधकारमय युग (Dark Ages) असेही यरोपमध्ये संबोधले जाते. रोमन साम्राज्याच्या ऱ्हासानंतरचा हा सुरवातीचा काळ होता. CNN या वेबसाईटने ही बातमी दिली आहे.
या सांगाड्यांचा अभ्यास केल्यावर या महिलांचे जीवन कष्टप्रद असल्याचे दिसून येत आहे. कारण बहूतेक महिलांची हाडे तुटलेली आढळून आली आहेत. अभ्यासकांच्या मते त्या शेतीमध्ये कामगार म्हणून काम करीत असाव्यात तसेच त्यांना एका वेगळयाच ठिकाणी पुरण्यात आले होते. तसेच त्यांना आर्थरायटीस सारखा हाडांचा कोणतातरी आजार असावा, कारण अनेक सांगाड्यांमधील हाडेही मोडलेली व सांध्यांची रचना बिघडलेली दिसून येत आहे.
कार्डिफ युनिवर्ससिटीचे ॲन्डी सिमन यांच्यामते या महिलांचे सांगाडे पाहिले की लक्षात येते की त्यांचे पाय व मान मोडलेले दिसून येते. हे शेतात काम करताना एखादा अपघात झाल्याची लक्षणे आहेत. तसेच हे ठिकाण समुद्रकाठावर आहे त्यामुळे या लोकांना माशांनी खाल्ले असावे असाही अंदाज व्यक्त होत होता. पण सिमन यांनी असा कोणताही पुरावा मिळाला नसल्याचे सांगितले आहे.
या महिला एका स्मशानभूमिजवळ राहत होत्या व तेथेच जेवत खात होत्या असे आढळून आले आहे. या सांगड्यांबरोबरच काही श्रीमंत लोकांनाही या स्मशानभूमीत पुरत असावेत असाही अंदाज आहे कारण याठिकाणी एक काचेचा ग्लास सापडला असून तो तत्कालिन फ्रान्समध्ये वापरला जात असे. पण या लोकांचा मृत्यू हा खराब आरोग्यामूळे झाला असावा असा अंदाज मांडला आहे.
ॲन्ड्रू सिमेन यांच्यामते त्याकाळात श्रीमंत आणि गरीब यांच्यात फार फरक होता असे नाही. कारण हे सांगाडे स्पष्ट करतात की यातील बहूतेक लोक हे शेतामध्येच काम करीत असत. या उत्खननात एखादी सापडेली वस्तू ही त्यांचे समाजातील स्थान स्पष्ट करत नाही. त्यामुळे पुरलेले हे सर्व सांगाडे गरीबांबरोबर श्रीमंतांचेही असावेत असे सीमन यांनी स्पष्ट केले.