Chinese Boat Capsizes : हिंद महासागरात चिनी मच्छीमारांची ‘बोट’ उलटली; ३९ बेपत्ता; शोध कार्य सुरू

Chinese Boat Capsizes
Chinese Boat Capsizes

पुढारी ऑनलाइन डेस्क : Chinese Boat Capsizes : हिंद महासागरात चिनी मच्छीमारांची 'बोट' (छोटेखानी जहाज) उलटून नावेतील सर्व 39 जण बेपत्ता झाले आहेत. ही दुर्घटना मंगळवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी तीन वाजता घडली. दरम्यान चीन सरकारने तातडीने बचाव कार्यासाठी शोध पथके पाठवली आहेत. तसेच अन्य राष्ट्र देखील मदत कार्यात सहभागी झाले आहेत.

दुर्घटनाग्रस्त बोटमध्ये एकूण 39 जण स्वार होते. त्यामध्ये 17 चिनी चालक दलाचे सदस्य, 17 इंडोनेशियन चालक दलाचे सदस्य आणि 5 फिलिपाइन चालक दलाचे सदस्य सहभागी होते. हे सर्व 39 जण बुडाले असून ते बेपत्ता आहे. दरम्यान, त्यांचा शोध सुरू केला आहे. तसेच त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Chinese Boat Capsizes : चिनी सरकारने जारी केले महत्वपूर्ण निर्देश

चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी घटनेनंतर महत्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. यामध्ये आपातकालीन प्रतिक्रिया सिस्टमला तातडीने अॅक्टिव्ह करण्याचे आवाहन केले आहे. यासंदर्भात चिनी कृषी आणि ग्रामीण मंत्रालय, परिवहन मंत्रालय, शेडोंग प्रांतीय सरकार सर्वांनाच स्थितीचे आकलन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच बचाव पथकातील सदस्यसंख्या वाढविली आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय शोध आणि बचाव पथकांसोबत समन्वय करण्यास सांगितले आहे. याशिवाय, चिनी परराष्ट्र मंत्रालय आणि परदेशातील संबंधित दूतावासांनाही स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधून शोध आणि बचाव मोहिमेत मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Chinese Boat Capsizes : अन्य राष्ट्रही करत आहेत सहकार्य

चिनी सागरी शोध आणि बचाव केंद्राने संबंधित देशांना माहिती दिली आहे. याशिवाय ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांचे बचाव पथकही बेपत्ता लोकांच्या शोधात मदत करत आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, मालदीव, इंडोनेशिया आणि फिलीपिन्समधील संबंधित दूतावासांशी समन्वय साधण्यासाठी आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा देखील सुरू केली आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news