ब्रिटनचे उपपंतप्रधान डोमिनिक राब यांचा राजीनामा, जाणून घ्या कारण

ब्रिटनचे उपपंतप्रधान डोमिनिक राब यांचा राजीनामा, जाणून घ्या कारण
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडचे उपपंतप्रधान डोमिनिक राब यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यावर धमकी दिल्याचा आरोप होत असतानाच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. न्याय मंत्रालय आणि व्हाइटहॉलच्या अन्य विभागाने राब यांनी धमकवल्याचा आरोप केला आहे. यानंतर डोमिनिक राब यांनी न्याय सचिव आणि उपपंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. कंजर्हेटिव्ह पक्षाचे संसद सदस्यांवर लोकांसोबत गैरवर्तवणूक केल्याचे आरोप होत होते.

याबाबत अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. यापूर्वी सुनक त्यांच्या पत्नी अक्षता मुर्ती यांना आर्थिक लाभ मिळवून दिल्याने चर्चेत होते. आता राब यांचा राजीनामा सुनक यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, राब यांनी सर्व आरोप नाकारले आहेत.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news