ली किआंग चीनचे नवे पंतप्रधान | पुढारी

ली किआंग चीनचे नवे पंतप्रधान

बीजिंग : वृत्तसंस्था चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसने (संसद) शनिवारी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे विश्वासू ली कियांग यांची पंतप्रधानपदी निवड केली. पहिल्या 7 मध्येही नसलेले ली अल्पावधीत सर्वश्रेष्ठ होयबा चिनी यंत्रणेत हे पद दुसर्‍या क्रमांकाचे मानले जाते. नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या 2,936 सदस्यांनी ली कियांग यांच्या बाजूने, तर 3 सदस्यांनी त्यांच्या विरोधात मतदान केले.

ली किआंग यांनीच चीनचे झिरो कोरोना धोरण तयार केले होते. ते पूर्णपणे फेल ठरले होते. याउपर कियांग यांना पंतप्रधानपद मिळण्याचे एकमेव कारण म्हणजे सर्वाधिक निष्ठावंत म्हणून त्यांनी कमावलेला शी जिनपिंग यांचा विश्वास. परवापरवापर्यंत किआंग हे चीनच्या पहिल्या 7 नेत्यांमध्येही नव्हते. फार थोड्या कालावधीत जिनपिंग यांचा सर्वश्रेष्ठ होयबा होण्यात त्यांनी यश मिळवले आणि या पदापर्यंत मजल गाठली. मतदानानंतर लगेचच माजी पंतप्रधान ली केकियांग यांनी ली कियांग यांच्याकडे पदाची सूत्रे सोपविली. जगातील दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्याची जबाबदारी कियांग यांच्यावर आलेली आहे.

Back to top button