2023 Nobel Peace Prize
2023 Nobel Peace Prize

2023 Nobel Peace Prize : 2023 च्या शांतेतच्या नोबेल पुरस्कारासाठी ‘जर्मनी-स्थित जागतिक उइगर काँग्रेस’ला नामांकन

पुढारी ऑनलाइन डेस्क : 2023 Nobel Peace Prize : 2023 च्या शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी जर्मनी स्थित उइगर काँग्रेसला नामांकन मिळाले आहे. त्यांना शांतता, लोकशाही आणि उइगर आणि इतर तुर्किक लोकांच्या दुर्दशेसाठी जे काम केले त्यासाठी त्यांना हे नामांकन मिळाले आहे. यासंबंधी व्हॉइस ऑफ अमेरिका ने अहवाल दिला आहे. चीनमधील दडपशाही शासन असे या नामनिर्देशन पत्राचे वर्णन केले आहे. एएनआयने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, जागतिक उइगर काँग्रेसचा मुख्य उद्देश उइगर लोकांसाठी लोकशाही, मानवाधिकार आणि स्वातंत्र्याचा प्रचार करणे आणि उईघर लोकांना आत्मनिर्णय साध्य करण्यात मदत करण्यासाठी शांततापूर्ण, अहिंसक आणि लोकशाही मार्गांच्या वापरास समर्थन देणे आहे, असे नामनिर्देशन पत्रात म्हटले आहे.

नामनिर्देशन पत्रात नमूद केल्याप्रमाणे जागतिक उइगर काँग्रेसने चीन सरकारचे शारीरिक, धार्मिक, भाषिक आणि सांस्कृतिक दडपशाहीच्या जबरदस्त मोहिमेद्वारे उइघर लोकांना चीनमध्ये मिळणा-या वागणुकीकडे जगाचे लक्ष वेधले आहे.

नियमांमुळे समितीने नोबेल शांतता नामांकित व्यक्तींची नावे उघड केली नसली तरी, या गटाला नामनिर्देशित करणार्‍या संसदेच्या दोन कॅनेडियन सदस्यांपैकी एक, Alexis Brunelle-Duceppe यांनी नाव उघड केले आणि ते पत्र VOA सोबत शेअर केले.

2023 Nobel Peace Prize : जागतिक उइगर काँग्रेसने केलेली कामे

जागतिक उइगर काँग्रेसने चीनकडून उइघर लोकांच्या करण्यात येणा-या शोषणातून त्यांची सोडवणूक करण्यासाठी विविध कामे केली आहे. यामध्ये बळजबरीने गायब करण्यात आलेल्या लोकांच्या हक्कांसाठी मोहीम, राजकीय कैद्यांच्या सुटकेसाठी वकिली करणे, चीनमध्ये जबरदस्तीने परत जाण्यापासून रोखण्यासाठी आश्रय शोधणा-यांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि वकिली करणे यासह विविध कामे केली आहेत. तसेच UN, EU आणि राष्ट्रीय स्तरावर जागतिक उइगर काँग्रेसने असंख्य यशांमध्ये यशस्वीरित्या योगदान दिले आहे. उइगर काँग्रेसच्या प्रयत्नामुळेच आंतरराष्ट्रीय समुदायाने उइघरांचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी धोरणे आणि कृती विकसित करण्यास मदत केली, असे ब्रुनेल-डुसेप्पे यांनी पत्रात म्हटले आहे.

logo
Pudhari News
pudhari.news