'डायनासोर'चा सर्वात मोठा जीवाश्म ऑस्ट्रेलियात सापडला
'डायनासोर'चा सर्वात मोठा जीवाश्म ऑस्ट्रेलियात सापडला

डायनासोर : महाकाय डायनासोरचा जीवाश्म ऑस्ट्रेलियात सापडला

पुढारी ऑनलाईन डेस्क : असं सांगितलं जातं की, डायनासोर युगात जितकी जैवविविधता होती, तितकी जैवविविधता आताच्या युगात नाही. कदाचित हेच कारण असेल आपल्या संशोधकांना डायनासोर यामध्ये विविध प्रजातीचे जीवाश्म मिळताहेत. यावेळी नुकतेच ऑस्ट्रेलियातील संशोधकांना आतापर्यंत सापडेलेल्या जिवाश्मांपैकी सर्वात मोठ्या डायनासोरचे जीवाश्म सापडलेले आहेत. हा शोध आतापर्यंतचा सर्वात मोठा शोध मानला जात आहे. कारण, ऑस्ट्रेलियात डायनसोरचे जीवाश्म सहजासहजी मिळत नाहीत.

पियरजे जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार ऑस्ट्रेलियोटाइटन किंवा साउदर्न टाइटन हा लांब मान असलेला हा टाइटनोसाॅरियन आहे. या प्रजातीचा डायनासोरची रुंदी  २५-३० मीटर इतकी होती, तर त्याची उंची ५ ते ६.५ मीटर इतकी होती. त्याच्या वजनाचा विचार केली की, १४०० कांगारूंचं वजन जितकं भरेल तितकं वजन डायनासोरचं होतं. हा महाविशाल डायनासोर दक्षिम-पश्चिम क्विन्सलॅंड परिसरात होते. सुमारे ९.२ ते ९.६ करोड वर्षांपूर्वी अस्तित्वात होते, असं संशोधकांकडून सांगण्यात आलं आहे.

तत्कालिन परिस्थितीत ऑस्ट्रेलिया हा ऑस्ट्रेलिया अंटार्क्टिकाला जोडलेला होता. आणि या प्रजातीचे डायनासोर हे डायनासोरच्या वंशावळीतील शेवटचे वंश होते. ऑस्ट्रेलियोटाइटन हा आतापर्यंत सापडलेल्या डायनासोर जिवाश्मांपैकी सर्वात मोठी जीवाश्म आहे. क्विन्सलॅंडच्या किनारी भागावरील खूप आतामध्ये असणाऱ्या मैदानांमध्ये या डायनासोरचे जीवाश्म आढळलेले आहे. आतापर्यंत सापडलेल्या डायनासोरचे जीवाश्म हे पर्वतांमध्ये, दऱ्यांमध्ये सापडलेले आहे. मात्र, हा डायनासोर मैदानामध्ये सापडलेले आहेत.

ऑस्ट्रेलियोटाइटन ज्या परिसरात राहत होते, तिथे तेल, गॅस आणि भरपूर चारा असलेल्या प्रदेशात ते राहत होते. या डायनासोरसंदर्भात झालेले संशोधन आतापर्यंत डायनासोर संदर्भात झालेल्या संशोधनामध्ये सर्वात मोठे संशोधन मानले जात आहेत. ऑस्ट्रेलियोटाइटन डायनासोरची हाडे पहिल्यांदा २००६ ते २००७ मध्ये क्विन्सलॅंड आणि इरोमॅग्नामध्ये नॅचरल हिस्ट्री म्युजियमचे जीवाश्म शास्त्रज्ञ आणि काही स्वयंसेविकांनी शोधलेले होते. 

'डायनासोर'चा सर्वात मोठा जीवाश्म ऑस्ट्रेलियात सापडला
'डायनासोर'चा सर्वात मोठा जीवाश्म ऑस्ट्रेलियात सापडला

ज्या ठिकाणी जीवाश्माचा शोध संशोधकांनी घेतला होता. त्या ठिकाणाला कूपर असं नाव देण्यात आलं होतं. कारण, जवळच्या कूपर क्रिक परिसरात उत्खनन केल्यानंतर संशोधकांनी पर्वतांतून मोठ्या कष्टाने या डायनासोरची हाडं काढण्यात यश मिळवलेलं होतं. कारण, हे का संशोधकांसाठी खूप महत्वाचे आणि आवश्यक होते. कारण, यामध्ये प्रत्येक डायनासोरच्या हाडांची ओळख मिळवणं गरजेचं होते. 

संशोधनकर्त्यांनी सांगितले की,त्यांना कूपरच्या हाडांची ऑस्ट्रेलिया आणि जगभर आढळाऱ्या साॅरोपाॅड डायनासोरच्या इतर प्रजातींशी तुलना करावी लागली. त्यामधून हे निश्चित करण्यात आलं की, नुकतेच सापडलेले डायनासोरचे जीवाश्म हे पूर्णतः वेगळी प्रजाती आहे. पण, जगभरातील म्युझियममध्ये ठेवण्यात आलेल्या शेकडो किलो असणाऱ्या हाडांशी या नुकत्याच सापडलेल्या नाजुक हाडांची तुलना करणं शक्य नाही. 

अप्रत्यक्षपणे हजारो किलो असणाऱ्या डायनासोरच्या हाडांना एकत्रितपणे लॅपटाॅपमध्ये सामावून घेतले जाईल अशा थ्रीडी स्कॅनिंगचा उपयोग संशोधकांनी केला. अशाप्रकारचे शोध नियोजनातून म्युझियम आणि एका संशोधकांकडून दुसऱ्या संशोधकापर्यंत किंवा लोकांपर्यंत आपल्याकडील अनोख्या संग्रहाचे प्रदर्शन जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी संधी दिली. 

संशोधकांनी या अभ्यासात साॅरोपाॅड डायनासोरचाही शोध घेतला आहे. जे ऑस्ट्रेलियामध्ये ९.२ ते ९.६ करोड वर्षांपूर्वीचे होते. हे डायनासोर एकमेकांवर अवलंबून होतेच, पण हे डायनासेर कधीही एकाच जागी आणि एकाच कालावधील एकत्र राहिले नाहीत. याचाच अर्थ असा की, हे डायनासोर वेगवेगळ्या परिसरांमध्ये विकसित झालेले होते आणि शक्यता अशीही आहे की हे डायनासोर एकमेकांना कधी भेटलेही नसतील. ऑस्ट्रेलियातील डायनासोरची प्रजाती दक्षिण अमेरिका आणि आशियाच्या टाइटनोसारियनशी संबंधित आहेत. यातून हे लक्षात येते की, ऑस्ट्रेलियातील डायनासोरची प्रजाती आंटार्क्टिकाच्या माध्यमातून दक्षिण अमेरिकामध्ये जागतिक तापमानवाढीच्या सुरुवातीच्या काळात पसरू शकले. 

पहा व्हिडीओ : समांतर-२ चा अभिनेता स्वप्नील जोशी आलाय तुमच्या भेटीला

logo
Pudhari News
pudhari.news