तुंगुस्का विस्फोट एलियन्सचं यान पृथ्वीवर आदळल्यामुळे झाला का?

'तुंगुस्का विस्फोट'मागचं रहस्य काय?
'तुंगुस्का विस्फोट'मागचं रहस्य काय?

अर्जुन नलवडे, पुढारी ऑनलाईन : मित्रांनो! ११२ वर्षांपूर्वी सायबेरियाम येथे अंगावर शहारा आणणारा तुंगुस्का विस्फोट झाला होता. पृथ्वीवरील सर्वांत मोठा धरणीकंप म्हणून याची नोंद आहे. या भयंकर स्फोटामुळे ८ झाडांची क्षणात राख झाली. हजारो रेनडियर्सचा (बर्फाळ प्रदेशातील हरीण) फक्त सांगाडा उरला. काही मेंढपाळ आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. हा सायबेरियामधील स्फोट मानवनिर्मित नव्हे, तर नैसर्गिक होता. एक खगोलशास्त्रातील महत्वाची घटना समजली जाते. तर पाहूया… या घटनेतील रोचक रहस्य…

सायबेरिया या ठिकाणी ११२ वर्षांपूर्वी हा नैसर्गिक स्फोट झाला होता. सायबेरिया हे ठिकाणी रशियामध्ये आहे. हा स्फोट पोडकामेन्नया तुंगुस्का नदी शेजारी झाला होता. या स्फोटातून निघालेला आगीचा गोळा हा तब्बल १०० मीटर रुंदीचा होता. या आगीच्या गोळ्याने २००० चौरस मीटर परिसरात असणाऱ्या जंगलाला राख करून टाकले होते. त्यामध्ये ८००० झाडांची राख झाली होती.

सायबेरियातील तुंगुस्का विस्फोट इतका मोठा होता की, ६० किलोमीटर असणाऱ्या गावातील घरांच्या खिडक्या तुटल्या होत्या. त्या आगीची धड गावकऱ्यांनाही बसली होती. काही जण तर, स्फोटाने जागेवरून उडाले होते. नशिबाने ज्या जागी स्फोट झाली तिथे फार मनुष्य वस्ती नव्हती. फक्त तिथल्या असंख्य रेनडिअर्सचा मृत्यू झाला. या भनायक स्फोटामध्ये एकाच मेंढपाळाचा मृत्यू झाला. कारण, तो स्फोटाने उडाला आणि एका झाडात जाऊन अडकला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता.

सायबेरियामधील या स्फोट ज्याने प्रत्यक्षदर्शी पाहिला, तो म्हणतो की, "तो क्षण माझ्यासाठी खूपच भयानक होता. असं वाटत होतं की, आकाशाचे दोन तुकडे झालेत. आकाशाला आग लागलीय. असं दिसत होतं की, आकाशातून पृथ्वीवर मोठा आगीचा गोळा येत आहे. त्यानंतर दगडांचा पाऊस आणि गोळीबाराचा आवाज येऊ लागला.

तुंगुस्का स्फोट नावाने जग या स्फोटाला ओळखतं. काही शास्त्रज्ञ म्हणतात की, हा स्फोट इतका मोठा होता की,,, हिरोशिमावर जो बाॅम्ब टाकला गेला, त्याच्या पेक्षा १८५ पट जास्त या स्फोटातून उर्जा निर्माण झाली होती. या स्फोटाने धरणीकंप झाला होता, त्याचे पडसाद ब्रिटनपर्यंत जाणवले. १०० हून अधिक वर्षं झाली. पण, अजूनही या स्फोटाचे रहस्य उलगडण्यात संशोधकांना यश मिळालेलं नाही.

असं समजलं जातं की, तुंगुस्कामध्ये उल्का किंवा धुमकेतू कोसळला असेल. पण, त्याचे पुरावे आपल्याला सापडलेले नाहीत. तुंगुस्का हा भाग सायबेरियातील दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. तिथलं वातावरणही अनुकूल नाही. तिथला हिवाळा दिर्घकाळ चालणारा आहे. त्यामुळे इथली जमीन दलदलीची झालेली आहे. त्यामुळे तिथं जाणं अवघड होतं.

या विस्फोटानंतर तब्बल २० वर्षांनी लिवोनिद नावाचा एक संशोधक तिथं पोहोचला. त्यांनं सांगितलं की, "तुंगुस्का स्फोटाच्या खुणा आजही तिथं पाहायला मिळतात. जळलेली झाडं ५० चौरस किलोमीटर परिसरात पडलेली होती. आकाशातून कोणती तरी भयानक आणि अजस्त्र वस्तू पृथ्वीवर येऊन आदळली होती. पण, या स्फोटाने जमिनीवर कोणता खड्डा तयार झाला नाही. कारण, तेथील जमीन दलदलीची होती. साधारणपणे भविष्यात या ठिकाणी लोखंडाचे तुकडे सापडू शकतील. त्यांचं वजन १०० किंवा २०० टन सहज असू शकतील."

जेव्हापासून हा विस्फोट होत आला आहे. तेव्हापासून या घटनेबद्दल तर्क-वितर्क सांगितले जात आहे. कोणी म्हणतं, मॅटर आणि अँटीमॅटरची मोठी धडक होती. कोणी म्हणतं, हा तर अणू विस्फोट होता. याच्या पुढे जाऊन काही जण म्हणतात की, तुंगुस्कामध्ये एलियन्स यांचं विमान येऊन आदळलं आहे. कारण, ते बायकल तलावातील ताज्या पाण्याच्या शोधात आलेले होते.

'तुंगुस्का विस्फोट'मागचं रहस्य काय?
'तुंगुस्का विस्फोट'मागचं रहस्य काय?

आणखी काही संशोधक १९५८ साली तिथे पोहोचले. त्यांना सिलिकेट आणि मॅग्नाईटचे काही तुकडे मिळाले. त्याच्यावर संशोधन केलं असता त्यामध्ये निकेल आढळून आले. निकेल तर, उल्कापातातून तयार झालेल्या पर्वतांमध्ये सापडते. या संशोधनाच्या आधारावर उल्कापात पृथ्वीवर येऊन आदळले, याला दुजोरा मिळाला.

तरीही या संशोधनावर कुणीही विश्वास ठेवला नाही. नेचर नावाच्या मॅगझिनमध्ये सांगण्यात आलं की, १९०८ मध्ये सायबेरियामध्ये एक ब्लॅक होल (कृष्ण विवर) पृथ्वीवर येऊन आदळले होते. तुंगुस्का विस्फोट त्याच्याच प्रभाव आहे. पण, याला विरोध झाला. कारण, त्याचे पुरावे तुंगुस्कामध्ये सापडलेले नाहीत. याला खरंतर वैज्ञानिकच कारणीभूत आहेत. कारण, याच्या संशोधनासाठी त्यांनी खूप वेळ घेतला.

बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की, उल्कापात हा प्रचंड मोठा असतो. तो पृथ्वीवर आदळला की, त्या विनाश होतो. साडे सहा करोड वर्षांपूर्वी पृथ्वीवर चिक्सबुल उल्कापात झाला होता. त्यामध्ये पृथ्वीवरील डायनासोर प्रजाती नष्ट झाली. त्यातून हा गैरसमज निर्माण झाला आहे. पण, मोठ्या स्वरूपात उल्कापात होतो असं नाही.

२०१३ मध्ये पुन्हा काही संशोधकांनी १९७८ साली मिळालेल्या तुकड्यांवर संशोधन केले आणि सांगितले की, "या तुकड्यांमध्ये ग्रेफाईट सापडले. ग्रेफाईट जास्त करून उल्कापातमध्ये सापडतं. त्यावरून हे सिद्ध होतं की, १९०८ मध्ये उल्कापात पृथ्वीवर आदळला होता." पण, हा वाद अजूनही मिटलेला नाही.

धूमकेतूने म्हणा किंवा उल्कापाताने म्हणा… सायबेरियामध्ये जो १९०८ साली विस्फोट झाला, ही घटना सामान्य नव्हती. त्यातून निर्माण झालेली उर्जा १० ते १५ मेगाटन टीएनटी विस्फोटाच्या बरोबरीची होती. शास्त्रज्ञ असं सांगतात की, खरंतर वायुमंडळ असल्यामुळे पृथ्वीचे संरक्षण होते. ब्रह्मांडामधील कोणतीही वस्तू ज्यावेळी पृथ्वीच्या दिशेने येते, तेव्हा ती वायुमंडळाच्या परिणामामुळे जळायला लागते. त्यातून त्याची असंख्य तुकडे होतात आणि मग पृथ्वीवर येतात.

खगोलशास्त्रातील सर्वात महत्वाची घटना मानली जाते. असे विस्फोट हजारो-लाखो वर्षानंतर अशी घटना घडते. तुंगुस्का विस्फोटासारखी  घटना जर मोठी लोकसंख्या असलेल्या शहरात घडली असती, तर मोठा विनाश झाला असता. पण, याची शक्यता कमी आहे. कारण, पृथ्वीचा ७० टक्के भाग हा समुद्राने व्यापलेला आहे.

व्हिडीओ पहा : विहीर नव्हे हा तर राजवाडाच 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news