वॉशिंग्टन : भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांची भेट घेऊन उभय देशातील धोरणात्मक संबंधाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली. यावेळी भारत आणि अमेरिकेमध्ये 443 कोटींच्या संरक्षण करारावरही स्वाक्षरी करण्यात आल्या.
राजनाथ सिंह चार दिवसांच्या अमेरिका दौर्यावर आले आहेत. दोन्ही देशातील जागतिक धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत करण्याबाबाबत सिंग यांनी सुलिवन यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी अमेरिकेतील संरक्षण कंपन्यांना भेट दिली. या कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करावी, याबाबतही सिंह यांनी महत्त्वपूर्ण चर्चा केली. दोन्ही देशांतील संरक्षण सहकार्य वाढविण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सिंह यांनी दिली. संरक्षण करारातून अमेरिका भारतात अँटी सबमरिन वॉरफेअरसह अन्य लष्करी सामग्रीचा पुरवठा करणार आहेत. भारत आणि अमेरिकेत गेल्यावर्षी संरक्षण आद्योगिक सहकार्याबाबत करार झाला होता. त्याच अनुषंगाने अमेरिकेसोबत संरक्षण करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली.