

मॉस्को : वृत्तसंस्था, २०२३ मध्ये अमेरिकेत गृहयुद्धाचा भडका उडेल आणि टेक्सास, कॅलिफोर्निया हे स्वतंत्र देश होतील… एलॉन मस्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील…. युरोपात देशांची पुनर्रचना होऊन फोर्थ राईशची निर्मिती होईल, अशी एक ना अनेक भाकिते करण्यात आली आहेत. ही भाकिते कुणा प्रसिद्धीलोलुप होरा भूषणने केली नसून चक्क रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमीत्री मेदवेदेव यांनी केली आहेत.
कोणतेही वर्ष सरत आले की नवीन वर्षाचे भविष्य वर्तवणाऱ्यांची गर्दी होते. तसे सुरूही झाले आहे. पण या सर्वात वेगळे आणि अजब भाकीत वर्तवले आहे ते रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी. सोमवारी त्यांनी २०२३ च्या आपल्या भाकितांची एक मालिकाच ट्विट केली आहे.
मेदवेदेव यांनी आपल्या भाकितात म्हटले आहे की, अमेरिकेत गृहयुद्ध होऊ शकते. त्यातून कॅलिफोर्निया आणि टेक्सास ही नवीन राष्ट्रे तयार होतील. टेक्सास आणि मेक्सिको यांचा एक देश तयार होईल. एलॉन मस्क हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील, असेही त्यांनी म्हटले आहे.
आपल्या भाकितात ते म्हणतात की, २०२३ मध्ये ब्रिटन पुन्हा युरोपीय समुदायात सहभागी होईल. तेलाच्या किमती १५० डॉलर प्रति बॅरल होतील. युरोपातील देशांच्या सीमांची पुनर्रचना होऊन पोलंडची पुन्हा फाळणी होईल.
फोर्थ राईश आणि फ्रान्सचे युद्ध
मेदवेदेव म्हणतात की, पोलंड आणि हंगेरी "युक्रेनच्या पश्चिम भागाचा लचका तोडतील. पोलंड, हंगेरी, चेक प्रजासत्ताक, बाल्टिक देश, युक्रेनचा काही भाग असा मिळून फोर्थ राईश तयार होईल व त्यांचे फ्रान्ससोबत युद्ध जुंपेल. तसेच आयर्लंड ब्रिटनपासून फुटून प्रजासत्ताक बनेल.
हे ही वाचा :