ऐतिहासिक निर्णय : अमेरिकेच्या सिनेटमध्ये समलिंगी विवाहांच्या अधिकारांना संरक्षण देणारा कायदा मंजूर | पुढारी

ऐतिहासिक निर्णय : अमेरिकेच्या सिनेटमध्ये समलिंगी विवाहांच्या अधिकारांना संरक्षण देणारा कायदा मंजूर

पुढारी ऑनलाइन डेस्क : समलिंगी विवाहांच्या अधिकारांना संरक्षण देणारा कायदा अमेरिकेच्या सिनेटमध्ये मंगळवारी पास करण्यात आला. हा एक मोठा ऐतिहासिक निर्णय ठरला आहे. कायद्यानुसार आता समलिंगी विवाह अधिकार आणि समलिंगी युनियन्सना फेडरल संरक्षण मिळणार आहे. 61-36 अशा द्विपक्षीय मतांनी रिस्पेक्ट फॉर मॅरेज अॅक्ट पास करण्यात आला. हे विधेयक पास करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचा देखिल एक महत्वाचा गट डेमोक्रॅट पक्षात सहभागी झाला. हे विधेयक आता सभागृहाकडे जाणार आहे. जिथे ते पुढच्या आठवड्यात लवकरच पास होण्याची अपेक्षा आहे.

या कायद्यामुळे ज्यांनी समलिंगी विवाह केले आहेत. त्यांचा विवाह रद्द ठरवण्यात येईल ही त्यांची चिंता आता दूर होईल, असे विस्कॉन्सिन डेमोक्रॅट सेन, टॅमी बाल्डविन, यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले की सिनेटला ही भीती दूर करण्याची आणि समलिंगी आणि आंतरजातीय विवाह करणा-या लाखो लोकांना त्यांना आवश्यक आणि पात्र असलेली निश्चितता, सन्मान आणि आदर देण्याची संधी यातून मिळणार आहे.

प्रेम हे प्रेम आहे आणि प्रत्येकाला आपल्या आवडत्या व्यक्तीशी लग्नाचा अधिकार आहे – बायडेन

हा कायदा पास करत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी कायद्याच्या बाजूने मतदान केले. याबाबत बोलताना बायडेन म्हणाले की, प्रेम हे प्रेम असते. तसेच प्रत्येक अमेरिकन व्यक्तीला त्यांच्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करण्याचा अधिकार असला पाहिजे. तसेच बायडेन हे ही म्हणाले की, आजच्या द्विपक्षीय सिनेटने विवाहाचा आदर कायदा मंजूर केल्यामुळे युनायटेड स्टेट्स एका मूलभूत सत्याची पुष्टी करण्याच्या उंबरठ्यावर आहे. हा कायदा हे देखील सुनिश्चित करेल की, पिढ्या न पिढ्या अनुसरण करण्यासाठी महत्वपूर्ण असेल. तसेच LGBTQI+ तरुणांना यामुळे जाणीव होईल की त्यांना देखील पूर्ण, आनंदी जीवन जगू शकतात आणि स्वतःचे कुटुंब तयार करू शकतात.

हे ही वाचा :

same-sex marriage | समलिंगी विवाहाला मान्यता देण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडे उत्तर मागितले

UP Accident : बस व ट्रकची धडक, भीषण अपघातात ६ ठार; १५ जखमी

Back to top button