Earthquake | हॉलिवूड भूकंपाने हादरले; ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान जाणवले धक्के

भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तर हॉलिवूडमध्ये होता
Earthquake
Earthquake|हॉलिवूड भूकंपाने हादरले; ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान जाणवले भूकंपाचे धक्केFile Photo
Published on
Updated on

वॉशिग्‍टन : पुढारी ऑनलाईन

अमेरिकेच्या हॉलिवूडमध्ये ३.९ रिश्टर स्‍केल तीव्रतेचा भूकंप झाला. जेंव्हा जगातील दिग्‍गज तारे ऑस्कर पुरस्कार सोहळा साजरा करत होते अशावेळी हा भूकंप झाला. ९७ वा ऑस्‍कर पुरस्‍कार सोहळा डॉल्‍बी थेटरमध्ये सुरू होता, तेंव्हाच भूकंपाचे झटके जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तर हॉलिवूडमध्ये होता. (Earthquake)

केंव्हा झाला भूकंप

भूकंपाचे केंद्र समारंभाच्या स्‍थळापासून काही मैल अंतरावर होता. स्‍थानिक वेळेनुसार हा भूकंप (रविवार) रात्री १० वाजता झाला. लोकांनी सांगितले की भूकंपानंतर इमारतीमध्ये धक्‍के बसले. इमारती हलताना दिसल्‍याचेही काही लोकांनी सांगितले. अमेरिकेतील भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण (USGS) यांनी सांगितले की, भूकंपाचे धक्‍के साऱ्या लॉस एंजिल्‍समध्ये अनेक मैलापर्यंत जाणवले.

भूकंपाची तीव्रता कमी असल्याने त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही. आतापर्यंत कोणत्‍याही प्रकारचे नुकसान किंवा जीवितहानीची माहिती समोर आली नाही. लॉस एंजिल्‍स च्या अग्‍निशमन दलाने सांगितले की, भूकंपाचे धक्‍के संपूर्ण डाउनटाउनमध्ये जाणवले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news