Fake Job Racket : म्यानमारमध्ये बनावट जॉब रॅकेटमध्ये अडकलेल्या आणखी 13 भारतीय नागरिकांची सुटका, आज तामिळनाडूला पोहोचले | पुढारी

Fake Job Racket : म्यानमारमध्ये बनावट जॉब रॅकेटमध्ये अडकलेल्या आणखी 13 भारतीय नागरिकांची सुटका, आज तामिळनाडूला पोहोचले

पुढारी ऑनलाइन डेस्क : Fake Job Racket : म्यानमारमध्ये बनावट जॉब रॅकेटमध्ये अडकलेल्या आणखी 13 भारतीय नागिरकांची सुटका करण्यात आली आहे. हे 13 जण आज तामिळनाडूला पोहोचले आहेत.

फक्त म्यानमारच नव्हे तर कंबोडिया, लाओस, बँकॉक येथे बनावट जॉब रॅकेटमध्ये अनेक भारतीय नागरिक अडकल्याचे समोर आले आहे. त्यानंतर या देशांमधील भारतीय दुतावासांनी याची दखल घेत त्यांच्या सुटकेसाठी पावले उचललली आहेत. म्यानमार येथून आतापर्यंत 45 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे.

Fake Job Racket गेल्या काही माहिन्यांमध्ये बँकॉकमध्ये उच्च पदावर नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने काही बनावट जॉब रॅकेट एजन्सीने अनेक तरुणांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. म्यानमारमधील बंडखोरांच्या परिसरात १०० हून अधिक भारतीय अडकल्याची घटना समोर आली आहे. या लोकांना थायलंडमध्ये चांगल्या नोकऱ्यांचे आमिष दाखवून बेकायदेशीरपणे म्यानमारमध्ये पाठवण्यात आले. तेथून त्यांना बँकॉकमध्ये पाठवण्यात येणार होते. दुबई आणि भारतातून सोशल मीडियाच्या माध्यमातून हे रॅकेट चालवले जात आहे.

Fake Job Racket MEA स्पॉक्स अरिंदम बागची, यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे. म्यानमारमध्ये बनावट जॉब रॅकेटमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या प्रकरणाचा आम्ही सक्रियपणे पाठपुरावा करत आहोत. जवळपास 32 भारतीयांची आधीच सुटका करण्यात आली होती. आणखी 13 भारतीय नागरिकांची आता सुटका करण्यात आली आहे आणि आज तामिळनाडूला पोहोचले आहे.

आणखी काही भारतीय नागरिकांची त्यांच्या बनावट नियोक्त्यांपासून सुटका करण्यात आली आहे आणि त्या देशात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याबद्दल ते म्यानमारच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहेत. त्यांना लवकरात लवकर परत आणण्यासाठी कायदेशीर औपचारिकता सुरू केल्या आहेत.

लाओस आणि कंबोडियामध्येही अशाच प्रकारच्या जॉब रॅकेटची उदाहरणे समोर आली आहेत. व्हिएन्टिन, नोम पेन्ह आणि बँकॉकमधील आमचे दूतावास तिथून लोकांना परत आणण्यासाठी मदत करत आहेत, असे बागची म्हणाले.

Fake Job Racket दरम्यान, या घटना समोर आल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून एडवायजरी जारी करण्यात आली आहे. तरुणांनी अशा रॅकेटमध्ये अडकू नये यासाठी त्या देशातील भारतीय दुतावासाकडून कंपनी व अन्य माहिती पडताळून घेण्याचे सांगण्यात आले आहे.

Back to top button