कीव्ह; वृत्तसंस्था : इस्रायलने गाझामधील अल-जौनी स्कूल आणि दोन घरांवर हवाई हल्ला केला. यामध्ये सुमारे 34 ठार झाले असल्याची माहिती समोर आली असून, अनेक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 19 महिला आणि 6 मुलांचा समावेश आहे.
मृतांमध्ये युनोच्या 6 कर्मचार्यांचाही समावेश आहे. या शाळेमध्ये शरणार्थींना ठेवण्यात आले होते. इस्रायलची ही कारवाई कदापि खपवून घेणार नसल्याचे संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी सांगितले. ते म्हणाले, या शाळेत 12 हजारहून अधिक शरणार्थी राहू शकतात. यामध्ये बहुतांश मुले आणि महिलांचा समावेश आहे.